Jalgaon Accident News : ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने 12 वर्षीय मुलाला चिरडलं; जळगावातील प्रकार
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jalgaon Accident News : निमगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर खाली आल्याने बारा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना घडली.
जळगाव, 20 डिसेंबर (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यासाठी ट्रक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून ऊस वाहतूक होत आहे. मात्र, ही वाहतून अनेकदा धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना यावल तालुक्यातून समोर आली आहे. येथे ऊस वाहतूक ट्रक्टरखाली आल्याने बारा वर्षांचा मुलगा ठार झाला आहे. या घटनेनंतर लोक संतापले असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
काय आहे घटना?
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या निमगाव येथे भरधाव ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली आल्याने बारा वर्षे मुलगा ठार झाला. आनंद रघुनाथ सोनवणे, असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मुलाचा मृतदेह हा यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला आहे. तर ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून निमगाव या गावात शोककळा पसरली आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Dec 20, 2023 11:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon Accident News : ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने 12 वर्षीय मुलाला चिरडलं; जळगावातील प्रकार









