Jalgaon : कारने दोन दुचाकींना उडवले, मुख्याध्यापकासह तिघांचा जागीच मृत्यू

Last Updated:

मालदाभाडी इथं दोन्ही दुचाकींना चारचाकी गाडीची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघांचाही मृत्यू झाला.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
जळगाव, 25 नोव्हेंबर : जळगावमध्ये जामनेर बोदवड रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. कार आणि दोन दुचाकींच्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. तीन वाहनांच्या विचित्र अपघातानंतर दुचाकीवरील बाजूला फेकले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी वाहनातील तिघे जखमी झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेरहून बोदवडकडे सुनील वही आणि दत्तू माळी निघाले होते. त्यांच्या मागे इश्वर पारधी हेसुद्धा दुचाकीवर होते. दरम्यान, मालदाभाडी इथं दोन्ही दुचाकींना चारचाकी गाडीची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघांचाही मृत्यू झाला. इश्वर त्र्यंबक पारधी हे जिल्हा परिषद शाळेत मुख्यध्यापक होते.
अपघातावेळी मागून येणाऱ्या पिकअप चालकाचेही त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. सुदैवाने त्याला यामध्ये किरकोळ दुखापत झाली. पिकअप चालकाने दिलेल्या माहितीनुसार, कारने दुचाकींना ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon : कारने दोन दुचाकींना उडवले, मुख्याध्यापकासह तिघांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement