advertisement

'तुझ्यासोबत शरीरसंबंध...', जळगावात बड्या अधिकाऱ्याची महिला डॉक्टरकडे मागणी, केबीनमध्ये बोलावलं अन्...

Last Updated:

जळगाव महानगरपालिकेत एका महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अखेर अटक करण्यात आली आहे

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव महानगरपालिकेत एका महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित महिला डॉक्टरने महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिने थेट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घोलपला अटक केली. या घटनेमुळे महापालिकेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पीडित महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. विजय घोलप वारंवार तिच्या केबिनमध्ये येऊन अश्लील टिप्पण्या करत होता. इतकेच नव्हे, तर त्याने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिला डॉक्टरने महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतरही हा छळ थांबला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तक्रार मागे घ्यावी यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव आणला जात होता. काही व्यक्तींना तिच्या घरी आणि तिच्या पतीच्या कार्यालयात पाठवून धमक्या दिल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय, तक्रार निवारण समितीची सदस्य असल्याचे भासवून एका महिलेनेही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला खोटी असल्याचे नंतर उघड झाले.
advertisement
या सर्व गंभीर आरोपांनंतर शहर पोलिसांनी डॉ. विजय घोलप विरुद्ध विनयभंगासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या गंभीर घटनेमुळे महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, महापालिकेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
'तुझ्यासोबत शरीरसंबंध...', जळगावात बड्या अधिकाऱ्याची महिला डॉक्टरकडे मागणी, केबीनमध्ये बोलावलं अन्...
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement