Ajit Pawar : भाषण सुरू असताना एका 'बहिणी'चा राडा, अजितदादाही थांबले, पोलिसांनी केली एंट्री
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तक्रारीची दखल घेत जळगावचे पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जळगाव, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणी करत आहे. राजकीय नेते राज्यभर प्रचारयात्रा आणि दौरे करत आहेत. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील परिस्थिती फार वेगळी असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणांनी राजकीय नेत्यांना जाब विचारला. असाच अनुभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज जळगाव दौऱ्यावर होती. यावेळी एका महिलेने सभेत गोंधळ घालत अजितदादांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. अजित पवार यांनी या घटनेची दखल घेत लगेच कारवाईचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
गावबंदी असताना देखील कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता महिलेसह 13 वर्षीय मुलीला त्रास देणाऱ्या आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी पारोळा येथील रहिवाशी असलेल्या जयश्री शंकर ठाकूर या महिलेने अमळनेर गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत गावगुंडापासून आम्हाला संरक्षण मिळून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. या गाव गुंडांचा त्रास इतका आहे की, 13 वर्षीय मुलीला चक्क गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तक्रारीची दखल घेत जळगावचे पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लवकरात लवकर या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याची देखील सांगितले आहे.
advertisement
अजित पवारांची जनसन्मान यात्रा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. नाशिकच्या दिंडोरी येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अजित पवारांची जनसन्मान यात्रा जळगाव जिल्ह्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार यांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला मिळाल्या आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांची अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Aug 12, 2024 8:24 PM IST
मराठी बातम्या/जळगाव/
Ajit Pawar : भाषण सुरू असताना एका 'बहिणी'चा राडा, अजितदादाही थांबले, पोलिसांनी केली एंट्री










