तुला खाऊ देतो म्हणत 35 वर्षीय तरुणाने 6 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर केली हत्या, जळगावं हादरलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षे मुलीला आरोपी तरुणाने तुला खाऊ घेऊन देतो असे आमिष दाखवलं. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले त्यानंतर तिचा खून करून केला.
नितीन नांदुरकर, जळगाव : जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षांच्या चिमुकलीवर ३५ वर्षीय तरुणाने अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सहा वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येने खळबळ उडाली असून नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. या प्रकरणी आरोपीला लवकर अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केलीय. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगावच्या जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंबातील एका सहा वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. अत्याचारानंतर खून झालेल्या मुलीचा मृतदेह जळगाव जिल्ह्या रुग्णालयात आणण्यात आला आहे. तिच्या नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला. तर आरोपीला अटक करून त्याला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आरोपीच्या नातेवाईकांनी केली आहे.
advertisement
दरम्यान, या घटनेने जळगाव जिल्हा हादरला असून घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षे मुलीला आरोपी तरुणाने तुला खाऊ घेऊन देतो असे आमिष दाखवलं. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले त्यानंतर तिचा खून करून केला. अत्याचार करणारा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 12, 2024 2:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
तुला खाऊ देतो म्हणत 35 वर्षीय तरुणाने 6 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर केली हत्या, जळगावं हादरलं










