शहीद नितीन पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; लेकीने दिला अग्नी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले हवालदार नितीन पाटील शहीद झाले आहेत. त्यांच्यावर आज शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जळगाव, 24 डिसेंबर, नितीन नांदूरकर : युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले हवालदार नितीन तुळशीराम पाटील शहीद झाले आहेत. त्यांच्यावर आज सकाळी एरंडोल तळी येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन पाटील यांच्या पार्थिवाला त्यांची मुलगी समृद्धी पाटील व काव्या पाटील यांनी अग्नी दिला.
यावेळी गावातील तरुणांनी पाचशे मीटर लांबीचा तिरंगा ध्वज फडकावत नितीन पाटील यांना अखेरचा निरोप दिला. अंत्ययात्रा निघाल्यानंतर वीर जवान अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून या वीर जवानाला निरोप दिला. याप्रसंगी गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
अंत्यविधीसाठी युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट कारगिल गनर्स सोबत नायब सुभेदार मुलानी रहीम, बीएचएम चंद्रशेखर काळे, हवालदार विनोद पाटील, स्टेशन हेडकॉटर भुसावळतर्फे हवालदार महेशकुमार नायक, भूषण पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगावचे नितीन पाटील, रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे या अधिकाऱ्यांनी तसेच पोलिस दलातर्फे हवेत तीन फायरी झाडून मानवंदना दिली.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Dec 24, 2023 3:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
शहीद नितीन पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; लेकीने दिला अग्नी









