Jalgaon : मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक, आईचे वयाच्या 75व्या वर्षी निधन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
नितीन नांदुरकर, जळगाव, 06 सप्टेंबर : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक झाला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाले. रेवाबाई रघुनाथराव पाटील या 75 वर्षांच्या होत्या. आज पहाटे पाळधी इथल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रेवाबाई पाटील यांच्या पार्थिवावर पाळधी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पाळधी येथील राहत्या घरून अंत्ययात्रा काढण्यात आली. पाळधी गावापासून काही अंतरावर असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शेतामध्ये त्यांच्या मातोश्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होती.
दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांची व एका समाजसेवकाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये मराठा आरक्षणावर न बोलण्यामुळे गुलाबराव ऐवजी तुम्हाला जुलाबराव म्हणायचं का? अशा शब्दात समाजसेवकाने गुलाबराव पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला. तेव्हा कार्यकर्त्याकडून गुलाबराव पाटील यांना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर गुलाबराव पाटील यांनीही कार्यकर्त्याला सुनावले. गुलाबराव पाटलांची ही ऑडिओ क्लिप फोटो लावून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 06, 2023 11:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon : मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक, आईचे वयाच्या 75व्या वर्षी निधन







