'एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन..'; पीएम मोदींच्या दौऱ्यावरून राऊतांनी भाजपला डिवचलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जळगाव, इम्तियाज अहमद, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून निशाणा साधला. 'नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात सध्या जास्त फिरत आहेत. हरियाणा पेक्षा जास्त मोठा पराभव दणदणीत पराभव हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
'नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात सध्या जास्त फिरत आहेत. हरियाणा पेक्षा जास्त मोठा पराभव दणदणीत पराभव हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी किती दौरे करावेत? कितीही फीती कापाव्यात? कितीही थापा माराव्यात? देशाच्या पंतप्रधानाने कुठे आणि किती वेळा जावं याबाबतचा शिष्टाचार आहे. पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करतात,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'महाराष्ट्रात मोदींना भाषण कोण लिहून देत आहे? भाषण करण्यापूर्वी त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. काल काय बोलले त्याचा आज पत्ता नाही आज काय बोलले त्याचा उद्या पत्ता नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Oct 06, 2024 2:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
'एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन..'; पीएम मोदींच्या दौऱ्यावरून राऊतांनी भाजपला डिवचलं










