Jalgaon Crime : जेवणासाठी आलेल्या तरुणाची धारदार शस्त्रानं सपासप वार करून हत्या, जळगाव हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून तीन ते चार जणांनी धारदार शस्त्रानं वार करून तरुणाची हत्या केली आहे.
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून तीन ते चार जणांनी धारदार शस्त्रानं वार करून तरुणाची हत्या केली आहे. किशोर अशोक सोनवणे वय 33, रा. कोळी पेठ जळगाव असं हत्या झालेल्या तरणांचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून, इतर मारेकरी फरार झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात किशोर अशोक सोनवणे (वय ३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ) या तरुणाचा जुन्या वादातून निघृण खून केल्याची घटना बुधवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
advertisement
किशोर सोनवणे हा रात्री कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानु येथे जेवणासाठी गेला होता. त्याच्यावर पाळत ठेवत इतर तरुणांना संशयित आरोपींनी बोलावून घेतले. हॉटेलमध्ये किशोर सोनवणे याच्यावर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून निघृण खून करण्यात आला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटस्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर मारेकरी फरार झाले आहेत. या खून प्रकरणात अजून किती जण आहे. याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
May 23, 2024 8:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon Crime : जेवणासाठी आलेल्या तरुणाची धारदार शस्त्रानं सपासप वार करून हत्या, जळगाव हादरलं










