advertisement

नाशिक-जळगाव मार्गावर भीषण अपघात, 2 कारचा चक्काचूर; एकाच कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Last Updated:

नाशिक-जळगाव मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

News18
News18
बब्बू शेख, प्रतिनिधी
जळगाव :  नाशिक-जळगाव मार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. दोन कारची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी आणि मयत एकाच कुटुंबातले असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघाताची नोंद पोलिसात झालीय. पोलीस अधिक तपास करत आहेत.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदगावच्या हिरेनगर जवळ नाशिक-जळगाव महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे.
अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी हे जळगावच्या पाचोरा आणि नाशिकच्या मोहाडी इथले आहेत. ते जळगावकडून नाशिकला जात असताना हा अपघात झाला आहे.  अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे शिवाजी भास्कर देशमुख आणि उषा नारायण महाजन अशी आहेत. तर अपघातात आशा शिवाजी देशमुख, विकास शिवाजी देशमुख, गयाबाई आदिक देशमुख, नारायण सुकदेव महाजन हे जखमी झाले आहेत.
advertisement
पुण्यात स्कूल बस आणि डंपरचा अपघात, अनर्थ टळला
सिमेंट मिक्सर डंपर आणि कोठारी इंटरनॅशनल स्कूलच्या 15 विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बस अपघात झाला. शाळेच्या बस चालकाच्या चुकीमुळे मोठा अपघात होता. कोठारी इंटरनॅशनल स्कूलची बस मुलांना शाळेत घेण्यासाठी येत असताना रस्त्यातच बस मधोमध वळून घेत होती. त्या शाळेच्या बसला लोहगावकडून अति वेगाने येणारा डंपर बसच्या समोरासमोर येऊन धडकला. मात्र डंपर चालकाच्या प्रसंग सावधतेमुळे त्याने डंपर रस्त्याच्या खाली घातला. डंपर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या बस मध्ये एकूण शाळेचे पंधरा विद्यार्थी होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
नाशिक-जळगाव मार्गावर भीषण अपघात, 2 कारचा चक्काचूर; एकाच कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement