Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट, लवकरच मुंबईला हलवणार
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Eknath Khadse Health Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात येणार आहे.
जळगाव, 5 नोव्हेंबर (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियमित तपासणी करण्यासाठी मुक्ताईनगर येथील रुग्णालयात गेले होते, या दरम्यान तपासणीत काही बदल आढलून आले. त्यानुसार एकनाथ खडसे यांना तातडीने जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांच्या तपासण्या करण्यात येत असून त्यांना आज सायंकाळी एअर ॲम्बुलन्सने मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खडसे आज नियमित तपासणीसाठी मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात गेले होते. यादरम्यान तपासणी ही तपासणी केली असता त्यात काही बदल आढळून आले. त्या बदलानुसार पुढच्या तपासण्या करण्यासाठी तातडीने जळगावला रवाना झाले. या ठिकाणी जळगाव शहरातील गजानन या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.
advertisement
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना तातडीने मुंबईला हलवणार#jalgaon #eknathkhadse #eknathkhadse pic.twitter.com/MT51GrfiM6
— News18Lokmat (@News18lokmat) November 5, 2023
खडसेंच्या प्रकृती बाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे ह्या या सुद्धा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. या ठिकाणी तपासण्या केल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनिय सूत्रांकडून मिळाली आहे.
advertisement
डॉक्टर काय म्हणाले?
एकनाथ खडसे यांना दोन दिवसांपासून छातीमध्ये त्रास सुरू होता. त्यामुळे ते दोनतीन तपासणीसाठी आले होते. या तपासण्यामध्ये छातीमध्ये काही बदल जाणवले. त्यामुळे पुढच्या तपासणीसाठी त्यांना मुंबईत हलवण्यात येणार आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. पण, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांनी आमच्यासोबत गप्पाही मारल्याचे डॉक्टर विवेक चौधरी यांनी सांगितले.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Nov 05, 2023 4:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट, लवकरच मुंबईला हलवणार









