Sharad Pawar pc : ...त्यामुळे शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नाकडं लक्ष द्या; 'शासन आपल्या दारी'वरून पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शरद पवार यांनी जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जळगाव, 5 सप्टेंबर : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये आगमन होताच त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्य शासनाकडून प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमावरून शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले पवार?
शरद पवार यांनी जळगावमधून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज खान्देशचा आढावा घेण्यासाठी आलो आहे. सामान्यांच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती आहे. राज्यात बरेच दिवस झाले पावसाचा पत्ता नाही. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. दुबार पेरणीनंतरही पिके वाचतील की नाही याबाबत शंका आहे. वीजपुरवठा नियमीत नसल्यानं शेतकऱ्यांना त्रास होतोय. कापसाला देखील समाधानकार भाव नाही. शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. केवळ कार्यक्रम घेऊन काही होणार नाही, असा टोला शरद पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
advertisement
शरद पवार यांचं भव्य स्वागत
दरम्यान जळगावमध्ये शरद पवार यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं आहे. शरद पवार यांचं जळगावमध्ये आगमन होताच त्यांच्यावर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांनी पाच जेसीबीद्वारे शरद पवार यांच्यावर फुलांची उधळन केली. तसेच तब्बल सव्वा क्विंटल वजनाचा पुष्पहार शरद पवार यांना घालण्यात आला. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं जळगावात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 05, 2023 12:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Sharad Pawar pc : ...त्यामुळे शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नाकडं लक्ष द्या; 'शासन आपल्या दारी'वरून पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला









