advertisement

Jalgaon Crime : जळगावमध्ये ‘बुलडोझर पॅटर्न’, भाजप नेत्याच्या मृत्यूनंतर गुन्हेगारांचे अड्डे केले जमिनदोस्त

Last Updated:

चाळीसगाव शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

News18
News18
जळगाव, प्रतिनिधी : भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं चाळीसगावमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यानंतर चाळीसगाव पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यत आली आहे.
चाळीसगाव शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी शहर पोलिसांनी अवैध धंद्यावर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील बस स्थानकामागील अवैध धंद्याच्या  टपऱ्यांवर चाळीसगाव शहर पोलिसांनी नगरपालिका प्रशासनाच्या मदतीनं बुलडोझर चालवला आहे. या टपऱ्या उद्धवस्त करण्यात आल्या आहेत.
सध्या हत्या, टोळी युद्ध, हाणामारी, गोळीबार यासारख्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीसाठी अवैध धंदे जबाबदार असल्याची चर्चा चाळीसगाव शहरात सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चाळीसगाव पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला सोबत घेऊन संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये अवैध धंदेसुरू असलेली ठिकाणं जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon Crime : जळगावमध्ये ‘बुलडोझर पॅटर्न’, भाजप नेत्याच्या मृत्यूनंतर गुन्हेगारांचे अड्डे केले जमिनदोस्त
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement