विरोधकांना कितीही बैठका घेऊ द्या; 2024 ला आम्ही 'एवढ्या' जागा जिंकणारच, आठवलेंचा मोठा दावा
- Published by:Ajay Deshpande
 
Last Updated:
आज आणि उद्या मुंबईमध्ये इंडियाची बैठक होणार आहे. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
भुसावळ, 31 ऑगस्ट :  आज आणि उद्या मुंबईमध्ये इंडियाची बैठक होणार आहे. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी कितीही बैठका घेतल्या तरी आम्हाला अडचण नाही, विरोधकांनी प्रयत्न करावा, आम्ही सामना करण्यासाठी सज्जा आहोत. 2024 ची मॅच 350 रण काढून आम्हीच जिंकणार असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले आठवले? 
इंडियाच्या बैठकीवरून रामदास आठवले यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांनी कितीही बैठक घेतल्या तरी आम्हीच जिंकणार आहोत असं आठवले यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी गॅसच्या अनुदानावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. याला आता आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
 उद्धव ठाकरेंना टोला  
उद्धव ठाकरे हे स्वतःच गॅसवर आहेत.  सर्वसामान्यांना दिलासा देण्याची जबाबदारी ही केंद्र  सरकारची असते. त्यामुळे गॅसच्या भावात दोनशे रुपयांची कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. उद्धव ठाकरे यांनी कितीही संताप व्यक्त केला तरी लोक त्यांना मतपेटीतून उत्तर देतील.  विरोधकांनी कितीही बैठका घेतल्या तरी अडचण नसल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.
advertisement
आज इंडियाची बैठक 
view commentsदरम्यान आज आणि उद्या मुंबईमध्ये इंडियाची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीला देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आज या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या नेत्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या मुख्य बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
August 31, 2023 1:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
विरोधकांना कितीही बैठका घेऊ द्या; 2024 ला आम्ही 'एवढ्या' जागा जिंकणारच, आठवलेंचा मोठा दावा


