Ujjwal Nikam : 'मी इच्छुक होतो पण..' निकम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पुतण्याची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ujjwal Nikam : ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
मुंबई, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : काँग्रेसने शुक्रवारी आमदार वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपनेही आपला पत्ता उघडला आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत निश्चित झाली आहे. निकम यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुतणे रोहित निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर त्यांचे पुतणे तथा भाजपचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. गेल्या काळात एकनाथ शिंदे यांनी रोहित निकम यांची भेट घेतली होती. मात्रस त्यावेळी राजकीय कुठलीही चर्चा झाली नव्हती. रोहित म्हणाले, की काका राजकारणात येतील असं कोणालाही वाटत नव्हतं, मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे कुटुंबात नक्कीच आनंद आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता माझे काका उज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नक्कीच त्याचा मला आनंद वाटतोय.
advertisement
तुमच्या कुटुंबात राजकीयदृष्ट्या विचार केला तर उज्वल निकम यांचे वडील बॅरिस्टर देवराव निकम हे चोपडा तालुक्यातून आमदार होते. काँग्रेस पक्षाकडून ते आमदार झाले होते. त्यानंतर उज्वल निकम यांच्या वहिनी या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. निकम कुटुंबात पहिल्यांदाच उज्वल निकम यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. ज्या पद्धतीने उज्वल निकम यांनी न्यायालयात आपली कामगिरी गाजवली. त्याच पद्धतीने ते खासदार म्हणून सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास रोहित निकम यांनी व्यक्त केली.
advertisement
उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या जळगाव येथील घरी वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे त्यांचे पुतणे रोहित निकम हे सुद्धा बातमी कळल्यानंतर उज्वल निकम यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना होत आहे. काका उज्वल निकम यांच्या उमेदवारीबद्दल मला खूपच आनंद झाला असून त्यांचा हा निर्णय योग्य निर्णय राहील असं मला वाटतं, असं रोहित म्हणाले.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
April 27, 2024 7:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Ujjwal Nikam : 'मी इच्छुक होतो पण..' निकम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पुतण्याची पहिली प्रतिक्रिया


