Bhusawal News : रेल्वेत जागा न मिळाल्यानं माथेफिरूचं धक्कादायक कृत्य; मोठा अपघात टळला!

Last Updated:

रेल्वेत प्रवास करत असताना जागा न मिळाल्याचा राग आल्यानं माथेफीरून धक्कादायक कृत्य केलं आहे.

News18
News18
जळगाव, 10 ऑक्टोबर : जिल्ह्यातील भुसावळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटक एक्स्प्रेसच्या दिव्यांग डब्यात प्रवास करत असताना जागा न मिळाल्याचा राग आल्याने एका माथेफिरूने धावत्या गाडीतून अपच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनावर लहान मुलाचा पाळणा फेकला. या प्रकरणी भुसावळ आरपीएफने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ही घटना चाळीसगाव ते मनमाड दरम्यान घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पवन कुमार वय (२६)  हा कर्नाटक एक्सप्रेसच्या दिव्यांगांसाठी असलेल्या डब्यातून प्रवास करत होता. मात्र त्याला तिथे जागा मिळाली नाही,  जागा न मिळाल्याचा राग आल्यानं त्याने धावत्या गाडीतून अपच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनावर लहान मुलाचा पाळणा फेकला. या प्रकारामुळे मोठा अपघात घडू शकला असता, मात्र सुदैवानं अपघात टळला आहे. भुसावळ आरपीएफने या माथेफिरूला अटक केली आहे. ही घटना चाळीसगाव ते मनमाड दरम्यान घडली.
advertisement
एक्स्प्रेसच्या इंजिनवर कोणीतरी काहीतरी  वस्तू फेकल्याचे लोको पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर पुष्पकच्या पायलेटने भुसावळ येथे संपर्क साधला. पायलटने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी रेल्वे भुसावळमध्ये दाखल झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Bhusawal News : रेल्वेत जागा न मिळाल्यानं माथेफिरूचं धक्कादायक कृत्य; मोठा अपघात टळला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement