advertisement

Jalgaon News : रावेरमध्ये तुफान दगडफेक; पोलिसांसह नागरिक जखमी, परिसराला छावणीचं स्वरुप

Last Updated:

जळगावातल्या रावेर तालुक्यात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली.

News18
News18
जळगाव, इम्जियाज अहमद, प्रतिनिधी : जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. घटनेनं खळबळ उडाली आहे. जळगावातल्या रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात तुफान राडा झाला आहे. दोन गटात हाणामारी झाली. नंतर दगडफेकही करण्यात आली. या घटनेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात ही घटना घडली आहे, पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. पैशांच्या देवाण -घेवाणीतून दोन गटात वाद झाला. वाद वाढल्यानं हाणामारीला सुरुवात झाली, आणि त्यानंतर दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन  पोलीस कर्मचाऱ्यांसह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
advertisement
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांच्यासह आरसीपी व दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सद्यास्थितीमध्ये गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : रावेरमध्ये तुफान दगडफेक; पोलिसांसह नागरिक जखमी, परिसराला छावणीचं स्वरुप
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement