advertisement

मोठी बातमी! जळगावात तुफान दगडफेक, जोरदार राडा; पोलीस बंदोबस्त वाढवला

Last Updated:

जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. जोरदार राडा झाला असून, तुफान दगडफेक करण्यात आली आहे.

News18
News18
जळगाव, इम्जियाज अहमद, प्रतिनिधी : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ कारणातून दगडफेक करण्यात आली आहे.  रावेर तालुक्यातील चिनावल गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान हल्लेखोरांनी वीजपुरवठा खंडित करून दगडफेक केली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर ग्रामस्थानी पोलिसांकडे धाव घेतली.  पोलीस चौकी समोर ठिय्या मांडत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या  दगडफेक प्रकरणात सावदा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील चिनावल गावात किरकोळ कारणावरून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. वीजपुरवठा खंडित करून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी मात्र दगडफेक करणाऱ्यांकडून अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यानं वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलीस चौकीसमोर ठिय्या मांडत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल.  पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर चिनावल गावात दंगा पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन दिवस गावात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
मोठी बातमी! जळगावात तुफान दगडफेक, जोरदार राडा; पोलीस बंदोबस्त वाढवला
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement