जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारनं 5 महिला 2 चिमुकल्यांना उडवलं, काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जळगावमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव कारनं घरासमोर उभ्या असलेल्या पाच महिला आणि दोन चिमुकल्यांना उडवलं आहे.
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी : जळगावमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव कारनं घरासमोर उभ्या असलेल्या पाच महिलांना उडवलं. या अपघातामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चार महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या मंगलपुरी येथील ही घटना आहे. या घटनेनंतर जमावाकडून कार चालकाला चांगलाच चोप देण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावातील मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभा राहून गप्पा मारणाऱ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडाला आहे.
या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून, चार महिला जखमी झाल्या आहेत. महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यालाही दुखापत झाली आहे. सुदैवानं हा चिमुकला थोडक्यात बचावला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या अपघातग्रस्त गाडीचा चालक जमावाच्या हाती लागल्यानं त्याला चांगलाच चोप देण्यात आला आहे. या अपघातामधील जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
शोभा रमेश पाटील (वय 60) असे या अपघामधील मृत महिलेचं नाव आहे. तर संगीता प्रकाश महाजन (वय ४८), जयश्री जगदीश राऊत (वय ३०), सुमनबाई साहेबराव पाटील (वय ६५), अर्चना पाटील (वय ४०) या महिला जखमी झाल्या आहेत. .या अपघातामध्ये दोन लहान मुलं देखील जखमी झाले आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
July 19, 2024 7:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारनं 5 महिला 2 चिमुकल्यांना उडवलं, काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं


