जळगावात शरद पवारांचं भव्य स्वागत; पाच जेसीबीनं फुलांची उधळण अन् सव्वा क्विंटलचा पुष्पहार
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांचं शहरात आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आलं आहे.
जळगाव, 5 सप्टेंबर, नितीन नांदूरकर : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केलं. त्यांनी महायुतीला पाठिंबा देत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांचा हा पहिलाच जळगाव दौरा आहे. ते आज जळगावमध्ये सभा घेणार आहेत. सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार जळगावच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र व्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या या दौऱ्याला कराडमधून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपली पहिली सभा ही छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथे घेतली. त्यानंतर त्यांची दुसरी सभा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये पार पडली आता शरद पवार यांनी आपला मोर्चा हा जळगावकडे वळवला आहे. त्यांची आज जळगावात जाहीर सभा होणार आहे.
advertisement
दरम्यान शरद पवार यांचं जळगावमध्ये आगमन झालं आहे. जळगावमध्ये त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं. शरद पवार यांचं जळगावमध्ये आगमन होताच त्यांच्यावर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांनी पाच जेसीबीद्वारे शरद पवार यांच्यावर फुलांची उधळन केली. तसेच तब्बल सव्वा क्विंटल वजनाचा पुष्पहार शरद पवार यांना घालण्यात आला. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं जळगावात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 05, 2023 11:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जळगावात शरद पवारांचं भव्य स्वागत; पाच जेसीबीनं फुलांची उधळण अन् सव्वा क्विंटलचा पुष्पहार









