indurikar maharaj : 'असा माणूस नाही की ज्याने मला शिव्या दिल्या नाही' इंदुरीकर महाराजांचा VIDEO व्हायरल
- Published by:sachin Salve
Last Updated:
जळगावात इंदुरीकर महाराज यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये जोरदार फटकेबाजी करत लक्ष वेधलं.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव, 29 डिसेंबर : आपल्या कीर्तनामुळे लोकप्रिय असलेले इंदुरीकर महाराज कायम चर्चेत असतात. जळगावमध्ये झालेल्या कीर्तन सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये 'असा माणूस नाही की ज्याने मला शिव्या दिल्या नाही. माझा एकच गुण आहे की मी खर बोलतो आणि खरं बोललो की त्याची फळं भोगतो' असं इंदुरीकर महाराज म्हणाले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
जळगावात इंदुरीकर महाराज यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये जोरदार फटकेबाजी करत लक्ष वेधलं. 'सगळ्यांचे घोडे मी एकटाच खातो, असा माणूस नाही की ज्याने मला शिव्या दिल्या नाही मात्र माझा एकच गुण आहे की मी खरं बोलतो आणि खरं बोलतो आहे त्याची फळ बघतो आहे, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे.
advertisement
जळगावातील महाबळ परिसरात नगरसेवक जितेंद्र मराठे यांच्या वतीने इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज बोलत होते. 'अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचे ध्यान आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्या शिवाय राहत नाही' असंही यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले.
advertisement
का म्हणाले इंदुरीकर महाराज?
'सगळ्यांचे घोडे मी एकटाच खातो, असा माणूस राहिला नाही की, ज्याने मला शिव्या दिल्या नाही. माझा एकच गूण आहे मी खरं बोलतो. एवढाच गूण त्याची फळं मी भोगतो. लोकांना थोडं वाईट वाटतं, पण मी आज हे गरजेचं आहे. संपत्ती आणि दया हे एकत्र येत नाही, पण आली तर तो माणूस देव झाल्या शिवाय राहत नाही. त्याला देव व्हायचं त्याने संपत्ती आणि दया एकत्र आली पाहिजे. दानाने लक्ष्मी ही दुप्पट होत असते. गायीची केलेली सेवा, तुळशीला घातलेलं पाणी, खऱ्या आईची केलेली सेवा, किर्तनकाराचं घेतलेलं दर्शन कधी फेल जाणार नाही. या कामाची नोंद इथं झाली नाहीतर वरती झाल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या दरबारामध्ये याची नोंद ही महत्त्वाची असते. - इंदुरीकर महाराज
Location :
Jalgaon Jamod,Buldana,Maharashtra
First Published :
Dec 29, 2023 6:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
indurikar maharaj : 'असा माणूस नाही की ज्याने मला शिव्या दिल्या नाही' इंदुरीकर महाराजांचा VIDEO व्हायरल









