Commissioner Santosh Khandekar: आधी पोलीस उपनिरीक्षक नंतर सनदी अधिकारी, तरीही भूक काही मिटली नाही, 10 लाख घेताना पालिका आयुक्त कसा पकडला?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Who is Commissioner Santosh Khandekar: जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच प्रकरणात अटक करून एसीबीने दिवाळीपूर्वीच जालना शहरात मोठा बॉम्ब फोडलाय.
जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच प्रकरणात अटक करून एसीबीने दिवाळीपूर्वीच जालना शहरात मोठा बॉम्ब फोडलाय. तब्बल दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना आयुक्त संतोष खंडेकर यांना रंगेहात पकडलं आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अंग झडतीमध्ये मोबाईल तर घर झडतीमध्ये 16 तोळे सोने, दोन किलो चांदी, पाच लाख वीस हजारांची रोख रक्कम आढळून आली.
advertisement
महापालिका आयुक्तसारख्या प्रतिष्ठित पदावरील अधिकाऱ्याने लाच स्वीकारल्याची जालना शहरातील ही पहिलीच घटना आहे. संतोष खांडेकर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहे. तब्बल सहा वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी सेवा बजावली आहे. यानंतर ते एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत आले. 2022 मध्ये जालना नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून नियुक्त झाले.
advertisement
तर 2023 मध्ये जालना शहर महानगरपालिका झाल्यानंतर त्यांना पालिका आयुक्तपदी बढती मिळाली. संतोष खांडेकर यांच्या विषयी सर्वसामान्य नागरिक आणि ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष होता. अँटी करप्शन चा सापळा यशस्वी झाल्यानंतर कार्यालयाबाहेर वाजलेली फटाके त्याचीच साक्ष देतात. दरम्यान 17 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी संतोष खांडेकर यांना जालना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
advertisement
न्यायालयाने संतोष खांडेकर यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 18 ऑक्टोबर रोजी आरोपी खांडेकर याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.. आगामी काळात तपासाची चक्री कशा पद्धतीने फिरतात आणि कोण कोणत्या नाविन्यपूर्ण गोष्टी समोर येतात हे पाहणं औत्सुक्याचा असणार आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 17, 2025 9:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Commissioner Santosh Khandekar: आधी पोलीस उपनिरीक्षक नंतर सनदी अधिकारी, तरीही भूक काही मिटली नाही, 10 लाख घेताना पालिका आयुक्त कसा पकडला?