Jalna: फोटो काढण्यासाठी खदानीत उतरले; पण पाण्याचा अंदाज चुकला आणि...जालन्यातील घटनेने खळबळ

Last Updated:

पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली आणि काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

Jalna News
Jalna News
जालना : जिल्ह्यातील वडारवाडी भागात रविवारी एक दुर्दैवी घटना घडली. फोटो काढण्यासाठी खदानीत गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थ अजय हरबळे (वय 16) आणि जस्मित रेहाल (वय 18, दोघेही बसस्थानक परिसरात राहणारे) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि जस्मित हे आणखी दोन मित्रांसह वडारवाडी येथील खदानीत गेले होते. मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी ते चौघेही खदानीच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने सिद्धार्थ आणि जस्मित पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत या दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
advertisement

पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे भाऊ मित्र खदानीजवळ फोटो काढण्यासाठी आले होते. पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, फोटो काढताना त्यांचा तोल गेला आणि ते पाण्याच्या  पडले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम

घटनास्थळाजवळील नागरिकांनी ही घटना पाहताच धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोल पाण्यामुळे मदत वेळेत पोहोचू शकली नाही. दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली आणि काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement

फोटो काढण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

दोन मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. बसस्थानक परिसरातील रहिवाशांमध्येही मोठी हळहळ व्यक्त होत आहे. फोटो काढण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात दुःखाचे वातावरण आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna: फोटो काढण्यासाठी खदानीत उतरले; पण पाण्याचा अंदाज चुकला आणि...जालन्यातील घटनेने खळबळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement