इंटरनेटवर सर्च केलं अन् घर सोडलं, जालन्याच्या अल्पवयीन मुलींनी थेट नेपाळ गाठलं, कारण धक्कादायक!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna News: जालन्यातील दोन अल्पवयीन मुलींनी शाळेला जातो सांगून घर सोडलं आणि थेट नेपाळ गाठलं. कारण ऐकून सगळेच हादरले.
जालना: आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्यांच्या हाती तंत्रज्ञान आले. यामुळे जग हे एक जागतिक खेडे बनले आहे. यामुळेच जालन्यातील बदनापूर येथील दोन मुली पर्यटनासाठी म्हणून थेट नेपाळला पोहोचल्या अन् 2150 किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत परतल्या. विशेष म्हणजे दोघीही अल्पवयीन असून शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या.
नेमकं घडलं काय?
जालन्यातील बदनापूरच्या दोघी अल्पवयीन मुली शाळेत जात असल्याचं सांगून घराबाहेर पडल्या. त्यांनी थेट मुंबई गाठली आणि मुंबईवरून बिहार अन् बिहार येथून थेट नेपाळ गाठले. मुली घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत मुली बेपत्ता असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक तपास करीत दोन्ही अल्पवयीन मुलींना मुंबईतून ताब्यात घेतले. मुली घरी सुखरूप परत आल्यानंतर कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. मुलीच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
advertisement
इंटरनेटवर शोधलं
विशेष म्हणजे या मुलींनी इंटरनेटवर पर्यटनासाठी 10 देश असं सर्च केलेलं आढळले. नेपाळमध्ये पासपोर्टची गरज नसल्याचे लक्षात आल्याने नेपाळला जाण्याचा निर्णय घेतला. या मुलींनी नेपाळमध्ये दोन दिवस हॉटेलमध्ये देखील मुक्काम केला. जानकीनाथ मंदिर पाहिले अन् तिथे देखील थांबल्या. या प्रवासात त्यांना 8 हजारांचा खर्च आला. फिरण्यासाठी घराबाहेर पडल्याची कबुली मुलींनी पोलिसांना दिली आहे.
advertisement
मुंबईमध्ये राहण्याची होती तयारी
नेपाळ फिरून झाल्यानंतर मुंबईकडे येताना रेल्वेमध्ये आदित्य झा याच्यासोबत मुलींची ओळख झाली. मुंबईमध्ये खोली करून देण्यासाठी मदत करा, अशी विनंती मुलींनी झाकडे केली. परंतु, सोमवारी (ता. आठ) रात्री उशिरा मुली मुंबईमध्ये दाखल झाल्याने झा वडिलांसोबत त्यांना घरी घेऊन गेला. तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिस आज झाच्या घरी गेले व तेथे मुली आढळल्या.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 10, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
इंटरनेटवर सर्च केलं अन् घर सोडलं, जालन्याच्या अल्पवयीन मुलींनी थेट नेपाळ गाठलं, कारण धक्कादायक!







