जालन्यात 125 पदांसाठी पोलीस भरती; उमेदवारांनी कोणती कागदपत्र सोबत आणावी?

Last Updated:

जालना जिल्ह्यात 125 पदांसाठी 19 जून रोजी भरती प्रक्रिया पार पडेल. यातून 102 पोलीस शिपाई पदं आणि 23 चालक पोलीस शिपाई पदं भरण्यात येतील.

+
पोलीस

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी याबाबत माहिती दिली.

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातल्या सर्व तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 17 हजार रिक्त पदं भरण्यासाठी 19 जूनपासून संपूर्ण राज्यभरात मैदानी चाचणी परीक्षा सुरू होणार आहे. या 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल झाले आहेत. जालना जिल्ह्यात 125 पदांसाठी 19 जून रोजी भरती प्रक्रिया पार पडेल. यातून 102 पोलीस शिपाई पदं आणि 23 चालक पोलीस शिपाई पदं भरण्यात येतील. भरती प्रक्रियेसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र सोबत घेऊन यावं, असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी कोणकोणती कागदपत्र आणावी, पाहूया.
advertisement
जालन्यात 125 पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी दिनांक 19 जूनपासून मैदानी चाचणीला सुरुवात होईल. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी माहिती दिली. 102 पोलीस शिपाई पदांसाठी 4 हजार 071, तर 23 पोलीस शिपाई चालक पदांसाठी 2 हजार 907 असे एकूण 6 हजार 978 अर्ज आले आहेत. त्या अनुषंगानी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
advertisement
उमेदवारानं ऑनलाईन काढलेला फॉर्म, ऑनलाईन प्रवेशपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, 10वी व 12वी पास प्रमाणपत्र, रहिवासी (डोमिसाइल), जात प्रमाणपत्र / जातवैधता / नॉनक्रिमिलेअर, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 30% आरक्षणाचं प्रमाणपत्र, EWS / SEBC / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / पोलीस पाल्य / होमागार्ड / अंशकालीन पदवीधर / खेळाडू / अनाथ /संगणक प्रमाणपत्र, हलके वाहन चालविण्याचा परवाना व 05 पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी मूळ प्रमाणपत्र, कागदपत्र आणि त्यांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
advertisement
पोलीस भरतीत काही लोक निवड करण्याचं प्रलोभन दाखवून उमेदवारांची दिशाभूल करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारांनी अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, शिवाय असं काही निदर्शनास आल्यास किंवा कोणी पैशांची मागणी केल्यास खालील दूरध्वनी क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
  • पोलीस उप अधीक्षक जालना: 9922799027
  • लाचलुचपथ प्रतिबंधक विभाग, जालना: 02482-220252
  • टोल फ्री क्रमांक: 1064
  • पोलीस नियंत्रण कक्ष, जालना पोलीस नियंत्रण कक्ष, जालना पोलीस नियंत्रण कक्ष जालना: 02482-225100, 02482-224833, 9604161100, 9604121100
  • पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा: 8552817101
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालन्यात 125 पदांसाठी पोलीस भरती; उमेदवारांनी कोणती कागदपत्र सोबत आणावी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement