तब्बल 1,00,00,000 रुपयांचा गांजा पकडला, पोलीस त्याच पुढे काय करतात? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
आपल्या आजूबाजूला अनेकदा अंमली पदार्थांचे सेवन किंवा साठा करणाऱ्यांना पोलिस किंवा अमली पदार्थ विरोधी पथके छापा टाकून हे अंमली पदार्थ जप्त करतात.
जालना : आपल्या आजूबाजूला अनेकदा अंमली पदार्थांचे सेवन किंवा साठा करणाऱ्यांना पोलिस किंवा अमली पदार्थ विरोधी पथके छापा टाकून हे अंमली पदार्थ जप्त करतात. या अंमली पदार्थांचे पुढे काय होतं? तुम्हाला माहितीये नाही ना! चला तर मग जाणून घेऊयात.
नुकतीच जालन्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी गावात पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. तब्बल चार क्विंटल गांजाची शेतीवर छापा टाकून तो जप्त केला. तब्बल 1 कोटी रुपये एव्हढी या जप्त केलेल्या गांजाची किंमत होती.
advertisement
जालना पोलिस दलाने अंमली पदार्थाची तस्करी, सेवन रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक स्थापन केलंय. या पथकाने 7843051026 हा हेल्पलाईन नं. जारी केलाय. याच नंबरवर आलेल्या कॉलमुळे ही कारवाई तडीस नेण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीवर अटक केली असून तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता दहशतवाद विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी सांगितले.
advertisement
कारवाईत जप्त केलेला गांजा हा सध्या पोलिस स्थानकात असून भविष्यात एका विशेष समितीच्या निगराणीखाली त्याला जाळून नष्ट केलं जाईल. अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर ते न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केले जातात, असं इंगेवाड यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
December 06, 2025 7:07 PM IST

