Jamkhed News: तिसरं अपत्य झालं, 'या' बाईंचं सरपंच पद गेलं; शरद पवार गटाला धक्का!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Jamkhed News: राजकीय वर्तुळात चर्चेत असणाऱ्या जामखेड तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायचीच्या लोकनियुक्त महिला सरपंच राणी जाधव यांचं संरपच पद...
जामखेड : राजकीय वर्तुळात चर्चेत असणाऱ्या जामखेड तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायचीच्या लोकनियुक्त महिला सरपंच राणी जाधव यांचं संरपच पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. राणी जाधव यांना 3 अपत्ये असल्यामुळे सरपंच आणि सदस्य पद रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. परंतु, या आदेशाबद्दल नाशिक आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी त्यांना देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे कोणी केली होती तक्रार?
रत्नापूरच्या महिला सरपंच राणी जाधव यांना 3 अपत्ये असल्यामुळे त्यांचं सरपंच अन् सदस्य पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी दिलेले आहेत. राणी जाधव या सप्टेंबर 2022 पासून लोकनियुक्त सरपंच म्हणून रत्नापूर ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्या होत्या. 2025 मध्ये त्यांना तिसरे अपत्य झालं आहे. त्यामुळे त्यांचं ग्रामपंचायतीचं सदस्य पद आणि सरपंच पद रद्द करून त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी लेखी तक्रार श्रीकांत रामचंद्र पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली होती.
advertisement
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी श्रीकांत पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर पुरावे सादर केले, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी राणी जाधव यांच्या सरपंच पद अन् सदस्य पद रद्द करण्याचे आदेश दिले. राणी जाधव या माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्या गटाच्या असून ते राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आहेत. सध्या वारे हे रोहित पवार यांच्यापासून दूर आहेत, त्यामुळे परिसरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
advertisement
हे ही वाचा : Maratha Morcha: अंतरवालीत हजारो मराठा बांधव दाखल, कोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे मुंबईकडे कूच करणार!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2025 9:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jamkhed News: तिसरं अपत्य झालं, 'या' बाईंचं सरपंच पद गेलं; शरद पवार गटाला धक्का!


