शिक्षकानेच काढली विद्यार्थिनीची छेड, मुल्लाला तत्काळ अटक करा, मुश्रीफांचे आदेश, जागेवर निलंबन केलं!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Kagal School Teacher Suspended: कागलच्या एका शाळेतील शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी शिक्षकाला चोप दिला.
ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नसीर मुल्ला असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप आहे.
ही बाब समजताच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेवर धडक दिली. त्यांनी संतप्त होत शिक्षकाला शाळेच्या आवारातच चोप दिला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शिक्षकाला तत्काळ अटक करा, हसन मुश्रीफ यांचे आदेश, जागेवर शिक्षकाचे निलंबन
घटनेची माहिती मिळताच आमदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी संबंधित शिक्षकाला तत्काळ अटक करा, असे आदेश दिले आहेत. यानंतर स्थानिक प्रशासनानेही तातडीने हालचाल करत शिक्षक नसीर मुल्ला याचे निलंबन केले आहे.
advertisement
या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांकडूनही घटनेची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बालकांचे संरक्षण आणि शाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पालकांनी शाळा प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Kagal,Kolhapur,Maharashtra
First Published :
Jul 01, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिक्षकानेच काढली विद्यार्थिनीची छेड, मुल्लाला तत्काळ अटक करा, मुश्रीफांचे आदेश, जागेवर निलंबन केलं!










