कसबा विधानसभा निवडणूक 2024 : प्रतिष्ठेच्या कसब्यात पुन्हा एकदा धंगेकर Vs रासने! वर्षभरात काय बदललं?

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024, Kasaba Assembly Constituency : धंगेकर विरुद्ध रासने हीच लढत पुन्हा एकदा होणार हे निश्चित झालं आहे. पण वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या कसब्यात यंदा काय चित्र दिसणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

कसब्यात पुन्हा एकदा धंगेकर Vs रासने!
कसब्यात पुन्हा एकदा धंगेकर Vs रासने!
पुणे : पुण्यात असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघांपैकी शहर हद्दीतील सगळ्यात प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील. वर्षभरापूर्वी याच जागेवर पोटनिवडणूक झाली होती आणि धक्कादायक निकाल देत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर भाजपच्या हेमंत रासने यांना पराभूत करून आमदार झाले होते. आता या मतदारसंघातून महाविकास आघाडीने विद्यमान आमदार धंगेकरांची उमेदवारी जाहीर केली होतीच. युतीनेही उशिरा का होईना इतर सर्व शंकांना पूर्णविराम देत पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. धंगेकर विरुद्ध रासने हीच लढत पुन्हा एकदा होणार हे निश्चित झालं आहे. पण वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या कसब्यात यंदा काय चित्र दिसणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ इतिहास
कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. 28 वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व होतं. ते रवींद्र धंगेकर यांनी मोडून काढलं आणि बऱ्याच काळाने पुण्याचा कसबा काँग्रेसला मिळवून दिला.
1995 पासून 2019 पर्यंत गिरीश बापट आणि 2019 मध्ये मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आता हे दोन्ही माजी आमदार हयात नाहीत. 2023 मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळवला होता.
advertisement
हेमंत रासने हे सलग चारवेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. सलग तीनवेळा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पदावर त्यांनी कार्य केलं आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून कसब्यात रासने काम करतात. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत.
धंगेकर यांचंदेखील ग्रासरूटवर काम जोरदार आहे. 2009 सालापासून ते निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीला ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते. त्यांनी त्या वेळीही कसब्यातून मनसेतर्फे भाजपच्या गिरीश बापटांना चांगली टक्कर दिली होती. मनसे त्या वर्षी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारा पक्ष ठरला होता. त्यानंतर 2019 च्या अगोदर धंगेकर काँग्रेसवासी झाले.
advertisement
जात फॅक्टर महत्त्वाचा
गिरीश बापट आणि त्यानंतर मुक्ता टिळक यांच्या माध्यमातून कसब्यात सातत्याने ब्राह्मण समाजाचा आमदार निवडून येत होता. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता त्यांच्या जागी ब्राह्मण उमेदवार न झाल्याने या समाजात नाराजी पसरल्याच्या बातम्या होत्या. पोटनिवडणुकीत रासने यांना त्याचा फटका बसला. पण आता पुलाखातून बरंच पाणी वाहून गेलं आहे. या मतदारसंघात मराठा आणि ब्राह्मण समाजाचे मतदार अधिक आहेत.
advertisement
या वेळी मनसेनेही जोरदार तयारी केली आहे. गणेश भोकरे हे मनसेचे उमेदवार कसब्यातून लढतील. ते गणेश मंडळाचे युवा कार्यकर्ते आहेत. याशिवाय माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनीही बंडखोरीचं निशाण दाखवत स्वराज्य पक्षात सामील होत कसब्यातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आहे.
त्यामुळे या वेळची निवडणूक थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार नाही. याला इतर दोनही आहेत. कोण कसबा राखतो हे मतविभाजनावरही अवलंबून आहे.
advertisement
2024 लोकसभेत काय झालं?
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीने मैदानात उतरवलं होतं. पण त्यांच्याविरोधात माजी महापौर आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडून आले. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांनी चांगल्या मताधिक्याने पराभव केला. धंगेकर यांनी कसबा मतदारसंघातून  विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. प्रचारही जोरात केला. पण भाजपने सव्वा लाखांचा लीड मिळवत पुणे काबीज केले.
advertisement
2019 विधानसभा निवडणूक  कसबा मतदारसंघ निकाल
मुक्ता टिळक – भाजप - 75,492
अरविंद शिंदे – काँग्रेस- 47,296
याहीवेळी पुण्यातून सर्व जागा लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे यंदा तिरंगी लढत होऊ शकते.
पुणे जिल्ह्यात कोण कोण आमदार?
जुन्नर  -    अतुल बेनके (राष्ट्रवादी)
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
खेड आळंदी – दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
advertisement
शिरुर  - अशोक पवार (राष्ट्रवादी)
दौंड    - राहुल कुल (भाजप)
इंदापूर - दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी)
पुरंदर  - संजय जगताप (काँग्रेस)
भोर    - संग्राम थोपटे (काँग्रेस)
मावळ - सुनिल शेळके (राष्ट्रवादी)
चिंचवड - लक्ष्मण जगताप  - पोटनिवडणुकीनंतर अश्विनी लक्ष्मण जगताप (भाजप)
पिंपरी - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
भोसरी - महेश लांडगे (भाजप)
वडगाव शेरी   - सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरुड - चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासला - भीमराव तपकीर (भाजप)
पर्वती  - माधुरी मिसाळ (भाजप)
हडपसर -      चेतन तुपे (राष्ट्रवादी)
पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठ -   मुक्ता टिळक - (भाजप) पोटनिवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर (काँग्रस)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कसबा विधानसभा निवडणूक 2024 : प्रतिष्ठेच्या कसब्यात पुन्हा एकदा धंगेकर Vs रासने! वर्षभरात काय बदललं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement