छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला Royal ट्रिटमेंट, थाटात फेअरवेल

Last Updated:

कोरटकरने बाहेर येताना फिल्मिंग असलेली गाडी वापरल्यानं ही तक्रार करण्यात आलीय. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं याबाबत चौकशीची मागणी केलीय.

Prashant Koratkar
Prashant Koratkar
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारा तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर 17 दिवसांनंतर जेलच्या बाहेर आला आहे. पोलिस बंदोबस्तात कोरटकरला कोल्हापूर विमानतळावर नेण्यात आलंय, तेथून कोरटकर विमनानं रवाना झाला. कोरटकरचा निरोप जेलमधून समारंभ अतिशय थाटात झाला. कोरटकरची सुटका करण्यासाठी काळ्या फिल्मिंग असलेल्या कारचा वापर करण्यात आल्याने टीका केली जात आहे. .
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्या प्रकरणी कोरटकरवर 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर 25 मार्चला त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान कोरटकरची सुटका करण्यासाठी बंदी असलेल्या काळ्या फिल्मिंग असलेल्या कारचा वापर करण्यात आला. कोरटकरला सोडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून MH-08-AN-6776 या फिल्मींग कारचा वापर करण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. इतकेच नव्हे तर या संपूर्ण प्रकाराविरोधात कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी या संदर्भातील नाराजी मेलने व्यक्त करत संबंधित कारचा फोटोही निर्दशनास आणून दिला आहे.
advertisement

विमानतळावर सोडण्यासाठी वापरलेल्या गाडीच्या मालकाविरोधातही तक्रार

पाच दिवस पोलीस कोठडी आणि 12 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला आहे . शिवप्रेमींचा रोष असल्यानं त्याला पोलीस बंदोबस्त पुरवत विमानतळावर पोहचवण्यात आलं.. दरम्यान कोरटकरला विमानतळावर सोडण्यासाठी वापरलेल्या गाडीच्या मालकाविरोधातही तक्रार करण्यात आलीय. फिल्मिंग असलेली गाडी वापरल्यानं ही तक्रार करण्यात आलीय. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं याबाबत चौकशीची मागणी केलीय.
advertisement

रात्री उशिरा विमानाने नागपूरला येण्याची शक्यता

अवमान आणि इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी कोरटकर वर 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर 25 मार्चला त्याला अटक करण्यात आली होती.पाच दिवस पोलीस कोठडी आणि 12 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर त्याला जामीन मिळाला आहे.शिवप्रेमींचा रोष असल्याने त्याला पोलीस बंदोबस्त पुरवत विमानतळावर पोहचवण्यात आले आहे. प्रशांत कोरटकर रात्री उशिरा विमानाने नागपूरला येण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला Royal ट्रिटमेंट, थाटात फेअरवेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement