Kolhapur News: कोल्हापूर हादरलं! भाजी चिरण्यावरून वाद, मित्राला जागेवरच संपवलं, नेमकं काय घडलं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Kolhapur News: कोल्हापुरात भाजी चिरण्याच्या वादावरून एकाने 35 वर्षीय मित्राला संपवले. यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
कोल्हापूर: किरकोळ कारणातून टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. अशीच काहीशी घटना कोल्हापुरात घडलीये. दारू पिऊन एकत्र जेवण बनवताना भाजी चिरण्यावरून किरकोळ वाद झाला आणि मित्रानेच चाकू भोकसून एकाला संपवलं. मंगल मांझे असे 35 वर्षीय मृताचे नाव असून तो मूळचा ओडिसाचा आहे. शिरोली एमआयडीसीतील घटनास्थळावरून हल्लेखोर देवश्री प्रफुल्ल चंदन याला पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
मुळचे ओडिसाचे असणारे मंगल व देवाश्री हे दोघे मित्र हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे राहत होते. शिरोली एमआयडीसी परिसरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते जेवण बनवत असताना दोघांत वाद झाला. याच रागातून देवाश्री याने मित्र मंगल याला चाकूने भोकसलं. यात मंगलचा मृत्यू झाला.
advertisement
हल्लेखोराला अटक
या घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत असणाऱ्या हल्लेखोर देवाश्री चंदन याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चाकू पोलिसांनी जप्त केला असून चंदनवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Nov 25, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News: कोल्हापूर हादरलं! भाजी चिरण्यावरून वाद, मित्राला जागेवरच संपवलं, नेमकं काय घडलं?







