Kolhapur Crime : मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठ्या, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने अन्... कोल्हापूरात लगीन घरी सर्वात मोठी चोरी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kolhapur 50 tolas of jewelry stolen : चोरट्यांनी डॉ. परितेकर यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर, त्यांनी थेट बेडरूममधील लाकडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने लंपास केले.
Kolhapur Crime News : कोल्हापुरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता अरुण परितेकर यांच्या घरातून मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेले 50 तोळे दागिने चोरीला गेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. न्यू शाहूपुरीसारख्या वर्दळीच्या आणि गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी मारलेल्या डल्ल्यामुळे आता कोल्हापुरात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
55 लाख लाखांचे दागिने लंपास
ही घटना सोमवारी घडली. चोरट्यांनी डॉ. परितेकर यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर, त्यांनी थेट बेडरूममधील लाकडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने लंपास केले. यामध्ये तीन मंगळसूत्रे, कर्णफुले, सोनसाखळी, विविध अंगठ्या, तोडे, ब्रेसलेट आणि हिऱ्याचे टॉप्स यांचा समावेश आहे. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 55 लाख रुपये इतकी आहे. दागिने चोरताना चोरट्यांनी कपाटात ठेवलेली 25 हजार रुपयांची रोकडही घेऊन पलायन केले.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि तपास सुरू केला. गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांना अद्यापही या प्रकरणात कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.
सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरात आणि तेही दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यू शाहूपुरीसारख्या भागात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी दाखवलेले धाडस पाहून स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांना पकडावे आणि शहरात सुरक्षिततेची भावना पुन्हा निर्माण करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेने कोल्हापूर शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 13, 2025 8:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Crime : मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठ्या, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने अन्... कोल्हापूरात लगीन घरी सर्वात मोठी चोरी!