कोल्हापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना, महिलेला कित्येक दिवस साखळदंडाने कुलूपबंद अवस्थेत ठेवलं बांधून, कारण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kolhapur Crime News : कोल्हापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या एका महिलेची साखळदंडाने कुलूपबंद अवस्थेत बांधून ठेवण्यात आलं होतं.
Woman kept locked in a chain : कोल्हापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरात साखळदंडाने कुलूपबंद अवस्थेत असलेल्या पोलिसांकडून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी भागातील ही घटना आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महिलेची सुटका केली. महिलेला तिच्या कुटूंबियांनीच साखळदंडाने कुलूपबंद अवस्थेत बांधून ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी कुलुपाची चावी बनवणाऱ्या बोलावून तिची सुटका केली आहे. मात्र, हा प्रकार कशामुळे घडला? याबाबत प्रश्न देखील विचारला जातोय.
कुटूंबियांनीच महिलेला बांधून ठेवलं
पोलीस आल्यानंतर महिलेची अवस्था वाईट होती. तिला नीट उठायला देखील येत नव्हतं. महिलेच्या कुटूंबियांनीच महिलेला बांधून ठेवलं होतं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय. माणूस आणि प्राण्यांमध्ये फरक असतो, असं म्हणत अनेकांनी टीका केली आहे.
....म्हणून मला इथं बांधून ठेवलं - पिडित महिला
advertisement
दरम्यान, मला घरातून बाहेर जाण्यास मनाई केली जात होती, म्हणून मला इथं बांधून ठेवलं गेलं होतं, असं साखळदंडाने बांधून ठेवलेल्या महिलेने म्हटलं आहे. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महिलेला तपासणीसाठी घेऊन जाणार आहोत. तर त्यानंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
पुरोगामी कोल्हापुरात चाललंय काय?
advertisement
महाराष्ट्र, जो एकेकाळी पुरोगामी विचारांचा आणि सामाजिक सुधारणांचा ध्वजवाहक म्हणून ओळखला जात होता, तोच आज महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मोठ्या आव्हानांना सामोरा जात आहे. गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटना, विशेषतः हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, सायबर गुन्हे आणि रस्त्यावरची वाढती गुन्हेगारी, यांनी राज्यातील महिला सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटना केवळ आकडेवारी नाहीत, तर त्या महिलांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि असुरक्षिततेची भावना दर्शवतात.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
May 30, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना, महिलेला कित्येक दिवस साखळदंडाने कुलूपबंद अवस्थेत ठेवलं बांधून, कारण काय?