'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' आमच्यासाठी मोठा आधार, महिलांनी व्यक्त केल्या भावना!

Last Updated:

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे.

'लाडकी बहिण योजना' आमच्यासाठी मोठा आधार
'लाडकी बहिण योजना' आमच्यासाठी मोठा आधार
बुलढाणा : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, घरखर्च, ज्येष्ठांचा औषधोपचार आदी बाबींबरोबरच महत्त्वाच्या व तातडीच्या गरजा भागविल्या जात आहेत. ही योजना आमच्यासाठी मोठा आधार असल्याची बहिणींनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या रकमेतून संसाराला आधार मिळाला आहे. त्याचप्रमाणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे महिलांचे सशक्तीकरण होत आहे, अशी भावना यावेळी भगिनींनी व्यक्त केली.
बुलढाणा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान व विविध विकासकामांचे लोकार्पण समारंभ कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास झळकत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना व आनंद त्यांनी व्यक्त केला.
advertisement
रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते. खूप चणचण होती. मुलांना कपडे, स्वत:साठी साडी, शैक्षणिक साहित्य घ्यायचे होते. राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात…माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आणि माझी चिंता मिटली….’ माझ्या बँक खात्यात 17 ऑगस्टला योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले. त्यातून माझ्या कुटुंबाचा रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा झाला, अशी प्रतिक्रीया बोरखडे गावातील सौ. राधा शिवाजी झालटे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' आमच्यासाठी मोठा आधार, महिलांनी व्यक्त केल्या भावना!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement