'मुलगी पसंत नाही,आई-पप्पा मला माफ करा' श्रीहरीने शेवटचा VIDEO रेकॉर्ड केला आणि...
- Published by:sachin Salve
Last Updated:
मुलाच्या वडिलांच्या फिर्यादी वरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन सोळुंके, प्रतिनिधी
लातूर, 22 सप्टेंबर : ग्रामीण भागामध्ये सध्या लग्नाचा मुद्दा हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अशातच सोयरrक मोडल्यानंतर कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाचा तगादा लावल्याने तरुणाने व्हिडीओ तयार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील जढाळा इथं ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या तरुणाने व्हिडिओ व्हायरल करत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. श्रीहरी विठ्ठल पोटफळे (वय 27) असं या तरुणाचं नाव आहे.
advertisement
श्रीहरी पोटफळे यांचं काही दिवसांपूर्वी एक तरुणीसोबत लग्न जमलं होतं. त्याची सोयरीक सोमनवाडी येथील देवळकर यांच्या मुलीसोबत सोयरीक जमली होती. दुसऱ्याच दिवशी तरुणाने लग्न करायचं नाही, असं सांगितलं. त्यामुळे देवळकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी विनाकारण सोयरीक का तोडली, त्याचं कारण सांगा, यामुळे आमच्या मुलीची बदनामी झाली आहे. जो साखर खाण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यासाठी बराच खर्च झाला होता. त्या कार्यक्रमाचा खर्च देवळकर यांनी मृत तरुण श्रीहरी पोटफळे यांच्याकडे मागितला होता.
advertisement
मुलीसोबत जमलेली सोयरीक मोडली या कारणावरून एक लाख रुपयाची मागणी केली होती. मुलीकडच्या मंडळींनी पैशाचा तगादा लावून धरला होता. त्यामुळे या जाचास कंटाळुन श्रीहरी विठ्ठल पोटफळे याने मोबाईलवर एक व्हिडीओ तयार केला. आई-पप्पा मला माफ करा, मुलगी पास नाही म्हटल्यावर ते पैसे मागत आहे, मी माझ्या जीवनाचं बरं वाईट करून घेत आहे, असं म्हणत श्रीहरीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
मुलाच्या वडिलांच्या फिर्यादी वरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Latur,Maharashtra
First Published :
September 22, 2023 8:41 PM IST
मराठी बातम्या/लातूर/
'मुलगी पसंत नाही,आई-पप्पा मला माफ करा' श्रीहरीने शेवटचा VIDEO रेकॉर्ड केला आणि...


