Latur News : लातूरमध्ये भीषण अपघात; बसची स्कुटीला धडक, तरुणीचा मृत्यू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
लातूरमधून भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाली आहे.
लातूर, 14 सप्टेंबर, सचिन सोळुंके : लातूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. स्कुटीला बसनं धडक दिली, या अपघातामध्ये एक तरुणी जागीच ठार झाली आहे, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. बार्शी रोडवर असलेल्या जुन्या होंडा शोरुमसमोर हा अपघात झाला आहे. जखमी तरुणीला स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन तरुणी स्कुटीवरून महाविद्यालयात निघाल्या होत्या. याचदरम्यान त्यांच्या स्कुटीला बसने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीला स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बार्शी रोडवर असलेल्या जुन्या होंडा शोरुमसमोर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
advertisement
एसटी बसला आग
दरम्यान दुसरीकडे एसटी बसच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. नागपूरमधून देखील मोठी बातमी समोर आली आहे. प्रवासी असलेल्या एसटी बसनं अचानक पेट घेतला. चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला आहे. नागपूर- अमरावती मार्गावरील ही घटना आहे. एसटी कोंढाळी बसस्थानकावर आल्यानंतर अचानक बसला आग लागली. आगीची घटना लक्षात येताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. वेळीच आग अटोक्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनं पुन्हा एकदा एसटी बसच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Location :
Latur,Latur,Maharashtra
First Published :
September 14, 2023 2:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : लातूरमध्ये भीषण अपघात; बसची स्कुटीला धडक, तरुणीचा मृत्यू


