Latur : गौतमीच्या कार्यक्रमात चाहत्यांचा राडा, तरुणाच्या डोक्यात लागला दगड; नेत्याचं बॅनर फाडलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय.
नितीन नांदुरकर, जळगाव : लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमात हुल्लडबाजी करत तरुणांनी राडा घातला. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या एका तरूणाच्या डोक्यात दगड लागल्याने तरूण जखमी झालाय . संतप्त तरुणांनी नेत्यांचे बॅनर फाडत तरुण टॉवर वर चढले .
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजपा नेत्यांची हजेरी होती.
बीड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसा निमित्त गौतमी पाटीलनेॉ तुफान डान्स केला. यावेळी चक्क चाहते गाडीच्या टपावर, घरावर, साउंडवर चढत डान्स करताना दिसले. #viral #Marathinews pic.twitter.com/9tnQbyLtGs
— News18Lokmat (@News18lokmat) February 3, 2024
advertisement
बीड जिल्ह्यातल्या कार्यक्रमातही तुफान गर्दी, घरावर, साउंड सिस्टिमवर चढून थिरकली तरुणाई
बीड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसा निमित्त गौतमी पाटीलने भन्नाट डान्स केला. विशेष म्हणजे महिला प्रेक्षकामध्ये घूसून डान्स करताच सर्व प्रेक्षकानी ठेका धरला. यावेळी चक्क चाहते गाडीच्या टपावर, घरावर, साउंडवर चढत डान्स करताना दिसले. बीडच्या दौलावडगाव येथे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसा निमित्त समर्थक अशोक ईथापे यांनी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील यांच्या चाहत्यांनी कमालीची मस्ती केली.
advertisement
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2024 8:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur : गौतमीच्या कार्यक्रमात चाहत्यांचा राडा, तरुणाच्या डोक्यात लागला दगड; नेत्याचं बॅनर फाडलं


