Latur News : कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी; खळबळजनक घटनेनं लातूर हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे.
लातूर, 23 सप्टेंबर, सचिन सोळुंके : लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पांडुरंग पितळे असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. ते लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पितळे यांनी कर्तव्यावर असताना डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. पांडुरंग पितळे हे लातूर येथील विवेकानंद पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांची ड्युटी गांधी चौकामध्ये लावण्यात आली होती. याचदरम्यान ही घटना घडली आहे.
advertisement
घटनेनं खळबळ
एका पोलीस कर्मचाऱ्यानं डोक्यात गोळी घालून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी गोळी का झाडली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेनं लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Location :
Latur,Latur,Maharashtra
First Published :
September 23, 2023 11:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी; खळबळजनक घटनेनं लातूर हादरलं


