Devendra Fadnavis : भाजपच्या पहिल्या यादीनंतर 'सागर'वर इच्छुकांची भरती, नाराजीच्या लाटा

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नावे न आलेल्या, तिकीट न मिळालेल्या आणि तिकीट मिळूनही नाराज असलेल्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगला गाठला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची तंबी!
देवेंद्र फडणवीस यांची तंबी!
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत ९९ उमेदवारांची नावे आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत नावे न आलेल्या, तिकीट न मिळालेल्या आणि तिकीट मिळूनही नाराज असलेल्यांनी आता मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगला गाठला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज इच्छुक आणि नाराजांचा दिवसभर राबता आहे. लोकसभेनंतर विधानसभेलाही पुन्हा एकदा ‘ सागर ‘ बंगला सर्वपक्षीय तक्रार निवारण केंद्र बनलं आहे.
पहिल्या यादीत नसल्याने नाराजी
पुण्यातील विद्यमान आमदार भीमराव तापकीर सागर बंगल्यावर दाखल झाले. भीमराव तापकीर यांचं नाव यादीत नाहीय. त्यामुळे ते भेटीसाठी दाखल झाले होते. भेटीनंतरही भीमराव तापकीर हे नाराज असल्याचं दिसून आलं. माध्यमांशी संवाद न साधता ते निघून गेले. तर मावळचे आमदार सुनील शेळकेंविरोधात भाजपचे बाळा भेगडे हे इच्छुक आहेत. तेसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले होते.
advertisement
तिकीट मिळूनही पाचपुते नाराज
श्रीगोंद्यातून भाजपने बबनराव पाचपुते यांच्या पत्नीला उमेदवारी दिलीय. तरीही पाचपुते कुटुंबिय नाराज आहेत. पत्नीला नव्हे तर पाचपुते यांनी मुलासाठी उमेदवारी मागितली होती. बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही आहेत. दुसरीकडे सुवर्णा पाचपुते यांच्याकडूनही बंडाचा झेंडा उंचावण्यात आलाय. त्या श्रीगोंद्यातून इच्छुक होत्या.
advertisement
मुरजी पटेल फडणवीसांच्या भेटीला
अंधेरी पूर्व येथून इच्छुक मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी  अर्ज भरला होता. मात्र अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्याने  त्यांनी माघार घेतली होती. सध्या या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या आमदार आहेत. तर लोकसभेत या ठिकाणी महायुतीला मताधिक्य मिळालं होतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : भाजपच्या पहिल्या यादीनंतर 'सागर'वर इच्छुकांची भरती, नाराजीच्या लाटा
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement