तुळजापूरमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती नेत्यांना करायची होती, खासदार ओमराजे निंबाळकर संतापले

Last Updated:

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील वादाला भाजप आमदार राणा पाटील यांना जबाबदार धरत पोलीस तपासावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

News18
News18
धाराशिव: तुळजापूरच्या गोळीबार आणि मारहाणीच्या घटनेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनारावृत्ती करायची होती असा सणसणाटी आरोप धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. कुलदीप मगर यांनी दिलेल्या फिर्यादीचा हवाला देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
ड्रग्स प्रकरणात विरोधक  तुळजापूरची बदनामी करतात अशी लक्षवेधी मांडतात. मुळात ही लक्षवेधी पोलिसांच्या विरोधात फडणवीस जे खातं सांभाळतात त्यांच्या खात्याच्या विरोधात ही लक्षवेधी मांडतात त्यांच्यावर अविश्वास दाखवतात मग आता दिवसा ढवळ्या फायरिंग केलं जातं, असे म्हणत ओमराजे निंबाळकर  यांनी संताप व्यक्त केला आहे.

ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले?

हातात कोयते घेऊन भररस्त्यात मारहाण केली जाते तुळजापूरची खरी बदनामी असून तुळजापूरच्या या गुंडगिरीला व गुंडगिरीला आश्रय देणाऱ्या पोलिसांना पाठबळ देण्याचे काम भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील हे करत आहे. जनाची नाही तर मनाची बाळगावी नियती बघून घेईल अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील वादाला भाजप आमदार राणा पाटील यांना जबाबदार धरत पोलीस तपासावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

तुळजापुरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचं पाहायला मिळालं. किरकोळ कारणांवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. कुलदीप मगरवर पिटू गंगेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. कुलदीप मगर कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सुरज साठे, चेतन शिंदे याने गोळीबार केला सागर गंगणे, शुभम साठे, शेखर गंगणे ,नंदू गंगणे, बालाजी गंगणे, अतुल दळवी या आरोपीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिंटू गंगणे यांच्या विरोधात प्रचार का केला? तुला उचलून त्यांच्या हवाली करत त्यांच्यासमोर संपवायचे आहे म्हणून मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. कुलदीप मगरच्या फिर्यादीत ड्रगजमापिया विनोद पिंटू गंगणे याचाही उल्लेख आहे. तर आठ आरोपीवर पोलिसांनी दहशत माजवणे फायरिंग करणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुळजापूरमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती नेत्यांना करायची होती, खासदार ओमराजे निंबाळकर संतापले
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement