Ganpati Visarjan: 'ये नहीं देखा तो, कुछ नहीं देखा'! ही आहेत मुंबईतील प्रसिद्ध गणेश विसर्जन स्थळं

Last Updated:

Ganpati Visarjan: 6 सप्टेंबर हा अनंत चतुर्दशीचा दिवस असल्याने या दिवशी ठिकठिकाणी बाप्पाचं विसर्जन केलं जाईल.

Ganpati Visarjan: 'ये नहीं देखा तो, कुछ नहीं देखा'! ही आहेत मुंबईतील प्रसिद्ध गणेश विसर्जन स्थळं
Ganpati Visarjan: 'ये नहीं देखा तो, कुछ नहीं देखा'! ही आहेत मुंबईतील प्रसिद्ध गणेश विसर्जन स्थळं
मुंबई : सध्या मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. 27 ऑगस्ट रोजी असलेल्या गणेश चतुर्थीपासून घराघरात बाप्पा विराजमान झालेले आहेत. 10 दिवसांचा हा उत्सव 6 सप्टेंबर रोजी संपले. 6 सप्टेंबर हा अनंत चतुर्दशीचा दिवस असल्याने या दिवशी ठिकठिकाणी बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. मुंबईतील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका जगप्रसिद्ध आहेत. या गोष्टी अनुभवण्यासाठी अगदी देश-विदेशातून देखील लोक येतात. तुम्ही देखील पहिल्यांदाच मुंबईतील गणेश विसर्जन अनुभवण्यासाठी येत असाल तर याठिकाणी विसर्जनाची प्रसिद्ध ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटी: अरबी समुद्रालगत असलेली ही चौपाटी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित विसर्जन स्थळ आहे. याठिकाणी लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि इतर सर्व मोठ्या आणि प्रसिद्ध मूर्तींचं विसर्जन केलं जातं. चर्नी रोज हे याठिकाणी जाण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. याठिकाणी उतरून गिरगाव चौपाटीला जाता येतं.
advertisement
शिवाजी पार्क चौपाटी: दादरच्या शिवाजी पार्क चौपाटी येथे मूर्ती विसर्जनासाठी असंख्य लोक येतात. या ठिकाणाहून वांद्रे वरळी सी लिंकचा अद्भुत नजारा देखील बघायला मिळेल. शिवाजी पार्क चौपाटीला जाऊन गणेश विसर्जन बघणे, म्हणजे एक क्लासिक आणि अविस्मरणीय अनुभव ठरतो. दादर हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. याशिवाय दादर मेट्रो स्टेशनपासून विसर्जनाचं ठिकाण पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.
advertisement
जुहू बीच: जुहू हे मुंबईतील एक क्लासिक आणि सुप्रसिद्ध ठिकाण आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी या ठिकाणी प्रचंड गर्दी जमा होते. अनेक भाविक समुद्रात जाऊन आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देतात. हे दृश्य डोळ्यांनी पाहताना मानवी भावभावनांचं अद्भूत दर्शन घडतं. जुहू बीचला जाण्यासाठी विले पार्ले हे सर्वात जवळचं स्टेशन आहे.
बँडस्टँड प्रोमेनेड, वांद्रे: बँडस्टँड हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे. कारण, याठिकाणी बसल्यानंतर एखादा बॉलिवूड सेलिब्रिटी दिसतो. याठिकाणी मरीन ड्राइव्हपेक्षा कमी गर्दी असते. याठिकाणी अनेक लहान मूर्ती विसर्जनासाठी आणल्या जातात. शिवाय, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर देखील येथून जवळ आहे. वांद्रे रेल्वे स्टेशनवरून 15 मिनिटांच्या अंतरावर बँडस्टँड आहे. तर शीतलादेवी हे जवळचं मेट्रो स्टेशन आहे.
advertisement
पवई तलाव: पवईच्या मध्यभागी असलेला हा कृत्रिम तलाव शहरातील गोंधळापासून खूप दूर आहे. जर तुम्हाला शांततेत गणरायाला निरोप द्यायचा असेल तर हे ठिकाणी चांगला पर्याय आहे. अंधेरी, गोरेगाव आणि विक्रोळीतील गणेश मूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी आणल्या जातात. पवई तलावावर जाण्यासाठी कांजूरमार्ग हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे तर आरे जेव्हीएलआर हे सर्वात जवळचं मेट्रो स्टेशन आहे. आरे जेव्हीएलआरपासून पवई तलाव 30 मिनिटांच्या अंतरावर आहे.
advertisement
वर्सोवा बीच: वर्सोवा बीचवरील गणेश विसर्जन सोहळा देखील बघण्यासारखा असतो. या ठिकाणी रात्रभर भाविकांचा उत्साह आणि अनोखी ऊर्जा अनुभवयाला मिळते. गणेशोत्सव हा मुंबईकरांच्या जगण्याचा एक भाग आहे, याची अनुभुती वर्सोवा बीचवर गेल्यानंतर होते. अंधेरी किंवा विले पार्ले ही वर्सोवा बीचवर जाण्यासाठी सर्वात जवळची रेल्वे स्टेशन्स आहेत. वर्सोवा येथे मेट्रो स्टेशन देखील आहे.
advertisement
गोराई जेट्टी, बोरिवली: मुंबईच्या गजबजलेल्या परिसरात वसलेली गोराई जेट्टी तुलनेने फार शांत ठिकाण आहे. याठिकाणी अतिशय शांततेत आणि सूर्यास्त बघत गणपती विसर्जन करता येतं. शिवाय, याठिकाणी उंटांची स्वारी आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. गोराई जेट्टीवर जाण्यासाठी बोरिवली हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganpati Visarjan: 'ये नहीं देखा तो, कुछ नहीं देखा'! ही आहेत मुंबईतील प्रसिद्ध गणेश विसर्जन स्थळं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement