Maharashtra Exit Poll : लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पालटणार, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर यायला सुरूवात झाली आहे. देशभरातल्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपचा विजयी रथ सुसाट असल्याचं दिसत आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पालटणार, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पालटणार, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर यायला सुरूवात झाली आहे. देशभरातल्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपचा विजयी रथ सुसाट असल्याचं दिसत आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसून येत असली तरी महाराष्ट्रात मात्र भाजपचं मिशन 45 प्लस यशस्वी होताना दिसत नाहीये. बहुतेक एक्झिट पोलमध्ये महायुती महाविकासआघाडीवर भारी ठरताना दिसत असली तरी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकासआघाडीला धक्का बसत असल्याचं दिसत आहे.
कोणत्या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?
न्यूज 18
महायुती- 32 ते 35
महाविकासआघाडी- 15 ते 18
एबीपी- सी व्होटर
महायुती- 22 ते 26
महाविकास आघाडी- 23 ते 25
टीव्ही 9 पोलस्ट्राट
महायुती- 22
महाविकासआघाडी- 25
इंडिया टुडे- ऍक्सिस माय इंडिया
महायुती- 28 ते 32
महाविकासआघाडी- 16 ते 20
चाणक्य
महायुती- 28 ते 38
महाविकासआघाडी- 10 ते 20
advertisement
इंडिया टीव्ही-सीएनएक्स
महायुती- 24 ते 32
महाविकासआघाडी- 17 ते 24
टाईम्स नाऊ-ईटीजी
महायुती- 26
महाविकासआघाडी- 22
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Exit Poll : लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पालटणार, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement