सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळांचं मराठा समाजाच्या नेत्याना ओपन चॅलेंज, म्हणाले...
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
नाशिकमध्ये बोलताना भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झालेला आहे. मलाही देवेंद्र फडणवीस यांनी आणि माझ्या नेत्यांनी अचानक हा निर्णय कळवला असल्याचं ते म्हणाले.
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाही. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. यावर आता स्वत: भुजबळांनीच खुलासा केला आहे. नाशिकमध्ये बोलताना भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झालेला आहे. मलाही देवेंद्र फडणवीस यांनी आणि माझ्या नेत्यांनी अचानक हा निर्णय कळवला.मला या निर्णयाची कोणतीही कल्पना नव्हती. मला महायुतीची जबाबदारी दिली की मी पूर्ण करणार असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीत संभ्रम वाढला आहे. दरम्यान, मराठा समाजाने केलेल्या विरोधावरही त्यांनी उत्तर दिलं असून मराठा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
छगन भुजबळ यांनी उमेदवारीसंदर्भात बोलताना म्हटलं की, मी मागे सुद्धा सांगितले माझा तिकिटासाठी आग्रह नव्हता मागणी नव्हती. मात्र दिल्लीत जी चर्चा झाली त्यात महाराष्ट्राच्या बाबत चर्चा झाली तेव्हा माझे नाव पुढे आले. याची कल्पना आम्हाला नव्हती. होळीसाठी निघालो होतो तेव्हा अर्ध्या वाटेतून मुंबईला गेलो. वरीष्ठ पातळीवरून ठरलं आहे असे सांगितले तेव्हा मी मला एक दिवस द्या म्हंटले. मी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली आणि विचारलं खरं आहे का? तर ते म्हंटले तुम्हाला उभं राहावे लागेल, आम्ही चाचपणी केली.
advertisement
उभं राहायचे असेल तर आधी तयारी करतात. पण ही गोष्ट बाहेर गेली आणि नाशिकमध्ये चर्चा झाली. शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनीही आग्रह लावून धरला आहे. वरिष्ठ जे निर्णय देतील तो मला मान्य आहे. महायुतीसाठी आम्ही एकत्र काम करू. जागा राष्ट्रवादीला सोडली तर घड्याळ चिन्ह राहील असंही भुजबळांनी सांगितलं.
मी मराठा समाजाला कधीच विरोध केला नाही
छगन भुजबळ यांच्याविरोधात नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजाने पोस्टरबाजी केली. गावबंदी केल्याचं त्या पोस्टरवर लिहिलं होतं. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, गावागावात बॅनर लागले मला कळलं. गावबंदी वैगरे वगैरे त्यावर होतं. पण मी मराठा समाजाला कधीच विरोध केला नाही. मी सपोर्ट केला आहे. नारायण राणे, फडणवीस यांनी आरक्षण आणलं तेव्हा मी सपोर्ट केला. मी फक्त एवढंच म्हणाले ओबीसीत नको वेगळं आरक्षण द्या. त्याला ही मी सपोर्ट केला, 10 टक्के आरक्षण मिळाले आहे
advertisement
निवडणूक निवडणुकीच्याने होऊद्या
इतर आरक्षणात वाटा करू नका. ही माझी चूक असेल तर मी केली. आरक्षणाला विरोध केला नाही. मराठा नेत्यांना माझं सांगणं आहे की निवडणूक निवडूनिकीच्याने होऊ द्या. पंकजा ताई मुंडे गेल्या तर त्यांना अडवलं, त्या तर काही बोलल्या नव्हत्या. भुजबळांना बोललं तर समजू शकतो त्यांना बोललं ही चूक नाही का? त्या वंजारी समाजाच्या आहेत त्यांना म्हणून का? प्राणिती ताई शिंदे कधी बोलल्या का ? जरांगे वर कधी बोलल्या का? गावात यायच नाही का ? दलित वंजारी आणि माळी लोकांनी उभं राहायचे नाही का ते तरी सांगा असा सवाल भुजबळांनी विचारला.
advertisement
मराठा लोकांना पण अडचण होईल
विरोध करणारे असे बोर्डस असतील आणि विरोध असेल तर मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. हाच विचार इतर समाज महाराष्ट्रात करेल. मराठा लोकांना पण अडचण होईल. नाशिक आणि देशाचा विकास होईल त्याचा फायदा सगळ्यांना होतो. आपण एअरपोर्ट, बोट क्लब केला तर तिथे सगळ्या जातीचे लोक जातात. गडावर ट्रॉली केली त्यातून सगळ्या समाजाचे लोक जातात. सगळे आनंदाने राहतात. जो विकास केला त्याची कास धरू असंही भुजबळ म्हणाले.
advertisement
शरद पवार काय करतील कुणाला सांगता येणार नाही
view commentsछगन भुजबळ म्हणाले की, देशाचा विकास कोण करतंय ते बघा ना ? मोदी साहेब बसलेत विकासाचे पाऊले पाडताय. विकासाचा विचार करा, नाशिकचे जनता सुज्ञ आहे. स्वतः प्रधानमंत्री साहेब ओबीसी नेते आहेत. माझ्या बद्दल म्हणाल तर मला जिथं काम करायला सांगतील तिथं मी काम करेल. मी यापूर्वी राम लीला मैदान भरवलं आहे. दिल्लीत जबाबदारी दिली तर नक्की करू. काल परवा तर पवार साहेब साताऱ्यात उभं राहणार आहे असं कळलं. ते उभे राहणार असतील तर सुप्रिया ताई आणि वाहिनींना कळणार नाही. ते काय करतील कुणाला सांगता येणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 30, 2024 2:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळांचं मराठा समाजाच्या नेत्याना ओपन चॅलेंज, म्हणाले...


