Loksabha Elections 2024 : दोन भाऊसाहेब अन् एकच तिकीट, एक जागा उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
- Published by:Shreyas
Last Updated:
शिर्डी लोकसभेची जागा लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातच स्पर्धा सुरू झाली आहे. परिणामी पक्षात दोन गट पडलेत.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी
अहमदनगर, 22 डिसेंबर : शिर्डी लोकसभेची जागा लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातच स्पर्धा सुरू झाली आहे. परिणामी पक्षात दोन गट पडलेत. भाऊसाहेब वाकचौरेंच्या पक्ष प्रवेशानंतर बबनराव घोलप नाराज झाले होते. त्यातच आता माजी आमदार भाऊसाहेब कांबळेही शिर्डी लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत.
साईबाबांच्या शिर्डीत शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सबुरी नसल्याचं पाहायला मिळतंय. दोन महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची घरवापसी झाली, मात्र यामुळे बबनराव घोलपांची जाहीर नाराजी पाहायला मिळाली. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली, त्यामुळे उमेदवारीच्या आशेने भाऊसाहेंब वाकचौरेंनी पुन्हा शिवबंधन हातलं.
advertisement
2009 मध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता. 2014 मध्ये वाकचौरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण सदाशिव लोखंडेंनी त्यांचा पराभव केला होता. पक्षाशी केलेल्या गद्दारीमुळे शिवसैनिकांचा वाकचौरे विरोध होता. मात्र सदाशिव लोखंडेंनी साथ सोडल्यामुळे वाकचौरेंची घरवापसी झाली. तर दुसरीकडे बबनराव घोलप यांनी केलेल्या नियुक्त्या बरखास्त करून रावसाहेब खेवरे यांना जिल्हाप्रमुख करण्यात आलं.
advertisement
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे दोनदा आमदार राहीलेले आणि 2019 मध्ये आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणारे भाऊसाहेब कांबळेंनीही शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
एकीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट दावा करत असताना काँग्रेसमधूनही जागा लढवण्यासाठी दबाव वाढत चाललाय. बाळासाहेब थोरात यांनी अजून त्यांची भुमिका स्पष्ट केली नसली तरी काँग्रेसच्या अनेकांनी लोकसभेची तयारी सुरू केलीय. परिणामी शिर्डी लोकसभा मतदारसंघात मविआच चांगलाच तिढा निर्माण होणार असल्याचं दिसतंय.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Dec 22, 2023 10:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : दोन भाऊसाहेब अन् एकच तिकीट, एक जागा उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?







