अमरावतीत बच्चू कडूंना मोठा हादरा, प्रहारच्या उमेदवाराने दिला महाविकास आघाडीच्या 'या' उमेदवाराला जाहीर पाठींबा

Last Updated:

प्रहारचे उमेदवार सय्यद अबरार यांनी दिला अचानक काँग्रेसचे उमेदवार (महाविकास आघाडी) सुनील देशमुख यांना पाठिंबा अचानक पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

News18
News18
अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा (Maharashtra Assembly Election 2024)  धुराळा उडाला आहे. निवडणुकांच्या या धामधुमीत अमरावतीत बच्चू कडू यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. परिवर्तन महाशक्तीचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ सय्यद अबरार यांनी चक्क उमेदवार यांनी महाविकास आघाडीच्या सुनील देशमुख यांना जाहीर पाठिंबा घोषित केला. सय्यद अबरार यांच्या या निर्णयामुळं परिवर्तन जनशक्तीमधील आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला मोठा हादरा बसला आहे.
प्रहारचे उमेदवार सय्यद अबरार यांनी दिला अचानक काँग्रेसचे उमेदवार (महाविकास आघाडी) सुनील देशमुख यांना पाठिंबा अचानक पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. उमेदवाराने पाठिंबा दिल्याने सुनील देशमुख यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे. अबरार यांच्या पाठिंब्यामुळे अल्पसंख्यांक मताची विभागणी होणार नाही आणि ती मते सेक्युलर पार्टीकडे वळतील असा विश्वास सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
advertisement

सय्यद अबरार यांच्यावर कोणताही दबाव आणलेला नाही : सुनील देशमुख 

सुनील देशमुख म्हणाले, सय्यद अबरार यांनी स्वखुशीने आम्हाला पाठींबा दिले. काल ते मला भेटले आणि म्हणाले माझ्या लक्षात आले की मी निवडणुकीत उभे राहणे हे फोल आहे. काही मते मी घेईल पण त्यामुळे सेकियुलर पार्टीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मी माझ्या जवळच्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यामध्ये सर्वांचे एकमत झाले की, विनाकारण उभे राहण्यात काही तथ्य नाही. त्यामुळे तुम्ही महाविकासआघआडीच्या उमेदवाराला पाठींबा द्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही किंवा आमीष दिले नाही.
advertisement

अल्पसंख्याक मतांमध्ये विभागणी करण्याचा विरोधकांचा डाव : सुनील देशमुख 

भाजप आणि महायुतीच्या काही लोकांना अल्पसंख्यांकांमध्ये विभागणी झाली पाहिजे असे वाटते. या मतामध्ये विभागणी झाली तर आपला उमेदवार निवडून येतो असे त्यांना वाटते. सय्यद अबरार यांच्या पाठींब्याचा आम्हाला फायदा होईल आणि मते सेक्युलर पार्टी म्हणून आमच्याकडे वळतील, असा विश्वास सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमरावतीत बच्चू कडूंना मोठा हादरा, प्रहारच्या उमेदवाराने दिला महाविकास आघाडीच्या 'या' उमेदवाराला जाहीर पाठींबा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement