Shivsena UBT Second List : मुंबईतून माजी महापौरांना तिकीट, श्रीगोंद्यात नागवडेंना लॉटरी, ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर
- Published by:Suraj
Last Updated:
Shivsena UBT Candidate second list : शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत ६५ उमेदवार होते. त्यानंतर आज 15 नावांची दुसरी यादी जारी करण्यात आली आहे
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केलीय. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत ६५ उमेदवार होते. त्यानंतर आज दुसरी यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत १५ नावांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाने भायखळा मतदारसंघात शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याविरोधात मनोज जामसुतकर यांना उतरवलं आहे. वडाळ्यातून माजी महापौर श्रद्धा जाधव, तर शिवडीतून विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलीय. चार दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना श्रीगोंद्यातून उमेदवारी दिली आहे.
ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा- (अज) राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
वडाळा - श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
advertisement
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागवडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 26, 2024 8:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivsena UBT Second List : मुंबईतून माजी महापौरांना तिकीट, श्रीगोंद्यात नागवडेंना लॉटरी, ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर









