Congress List : मविआचा धमाका, काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

Last Updated:

या यादीमध्ये काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील दोन जागांसाठी तिकीटं देण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अखेर सुटल्याची चिन्ह आहे. ठाकरे गट, पवार गटाच्या नंतर आता काँग्रेसनेही आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. एकूण 16 जणांची यादी आहे. या यादीमध्ये काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील दोन जागांसाठी तिकीटं देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने आतापर्यंत सर्वाधिक जास्त उमेदवार जाहीर केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून पेच निर्माण झाला होता. हा वाद अखेरीस दिल्ली हायकमांडाच्या दारात पोहोचला. दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मार्ग मोकळा झाला. आज सकाळपासून शिवसेना ठाकरे गटाने दोन याद्या जाहीर केल्या. त्यापाठोपाठ शरद पवार गटानेही आपली २२ जणांची यादी जाहीर केली. आता काँग्रेसकडूनही 16 उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत 87 उमेदवार जाहीर केले आहे.
advertisement
काँग्रेसची तिसरी यादी
कामगाव - राणा सानादा
मेळघाट - हेमंत चिमोटे
गडचिरोली - मनोहर पोरेटी
दिग्रास - मानिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण - मोहनरान आंबडे
देगलुर - निवृत्तीराव कांबळे
मुखेड - हेमंतराव पाटील
मालेगाव सेंटर - एजाज बेग एजिज बेग
चांदवड - शिरिशकुमार कोतवाल
एक्वतपुरी - लाकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम - ध्यानंद चोरघे
advertisement
अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
वांद्रे पश्चिम - असिफ झकारिया
तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
सांगली - पृथ्वीराज पाटील
काँग्रेसच्या पहिल्या यादीत वरिष्ठ नेत्यांना मानाचं पान
काँग्रेसने आपल्या 48 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांना संधी देण्यात आली. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. लातूरमधून देशमुख बंधुंना पुन्हा एकदा उमेदवार जाहीर केली होती.
advertisement
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 23 उमेदवार
पहिल्या यादीत ४८ तर दुसऱ्या यादीत २३ उमेदवारांची नावे आहेत. काँग्रेसने मुंबईत ३ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर दुसऱ्या यादीत काही नवे आणि जुने चेहरे आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर काही जागांवर शिक्कामोर्तब झाले.
मुंबईत तीन जागांवर उमेदवार
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील तीन जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. यात कांदिवली पूर्वमधून काळु बधेलिया, चारकोप यशवंत सिंग आणि सायन कोळीवाडा मतदारसंघात गणेश यादव यांना तिकीट दिलं आहे.
advertisement
नात्यागोत्यात तिकीट
अकोटमधून सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना तर अर्नी मतदारसंघातून शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांना तिकीट दिलं आहे. सावनेरमध्ये सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress List : मविआचा धमाका, काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement