Beed Election Result 2024: मनोज जरांगे फॅक्टरचा धुव्वा, बीडमध्ये महायुतीचा चमत्कार, विजयी उमेदवारीची यादी
- Published by:sachin Salve
Last Updated:
Beed Assembly Election Result 2024: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा आबादित राखला आहे.
बीड: विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. बीड जिल्ह्यामध्ये सहा जागेवरील सर्व निकाल हाती आलेले आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा आबादित राखला आहे. यामध्ये परळी मधून धनंजय मुंडे 1 लाख 40 हजार इतक्या मताधिक्यांना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मत घेऊन निवडून आलेले आहेत.
तर आष्टी मधून सुरेश धस हे 75 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे 5000 पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. गेवराईमध्ये विजयसिंह पंडित, केजमध्ये नमिता मुंदडा तर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांचा विजय झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये महायुतीला पाच तर महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवरती समाधान मानावे लागले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात बीडचा खासदार बदलण्यातही मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरला. त्यामुळे विधानसभेला काय होणार हा मोठा प्रश्न होता. पण जनतेनं महायुतीची साथ दिली आहे.
advertisement
Maharashtra Election Results: 1990 नंतर राज्यात पहिल्यांदाच असं घडलं, जे भाजपलाही अपेक्षित नव्हतं
बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवार
- परळी : धनंजय मुंडे - विजयी Vs राजेसाहेब देशमुख (NCP-SP)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (1,40,000 मताधिक्य)
- बीड : संदीप क्षीरसागर - विजयी
Vs योगेश क्षीरसागर (NCP- AP), अनिल जगताप (ज्योती मेटे शिवसंग्राम संघटना)
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (5,000 पेक्षा अधिक मताधिक्य)
- आष्टी : सुरेश धस,
भाजप ( 75000 पेक्षा अधिक मताधिक्य)
- गेवराई : विजयसिंह पंडित
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ( 42,000 अधिक मताधिक्य)
- केज : नमिता मुंदडा, भाजप (2700 )
- माजलगाव : प्रकाश सोळुंके,
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ( 5000 पेक्षा मताधिक्य)
advertisement
- पक्षीय बलाबल
- भाजप-2 (केज, आष्टी)
- NCP AP -3(परळी, गेवराई,माजलगाव)
- NCPSP- 1 (बीड )
Location :
Maharashtra
First Published :
November 23, 2024 4:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Election Result 2024: मनोज जरांगे फॅक्टरचा धुव्वा, बीडमध्ये महायुतीचा चमत्कार, विजयी उमेदवारीची यादी


