Pune Election Result 2024: 'म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, पुण्यात वारं फिरलं', संपूर्ण विजयी उमेदवाराची यादी

Last Updated:

Pune Assembly Election Result 2024: भाजपने सर्वाधिक 9 जागा जिंकून पुण्याचे आपणचं दादा हे स्पष्ट केलं आहे. त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या पक्षाने 8 जागा जिंकून आपला दबदबा कायम राखला आहे.

Pune Election Result 2024: 'म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, पुण्यात वारं फिरलं', संपूर्ण विजयी उमेदवाराची यादी
Pune Election Result 2024: 'म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, पुण्यात वारं फिरलं', संपूर्ण विजयी उमेदवाराची यादी
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी, पुणे : विधानसभा निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महायुती सरकारला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाला लोकांनी भर भरून मतदान केलं आहे. त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यात वर्चवस्व कुणाचं राहणार याची चर्चा रंगली होती. पण, इथं भाजपने सर्वाधिक 9 जागा जिंकून पुण्याचे आपणचं दादा हे स्पष्ट केलं आहे. त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या पक्षाने 8 जागा जिंकून आपला दबदबा कायम राखला आहे.
पुण्यात एकूण 21 मतदारसंघाच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. 21 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं आहे. कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकरांचा पराभव झाला आहे. त्यापाठोपाठ कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर या मतदारसंघामध्ये भाजपने विजय मिळवला आहे. भाजपने पुण्यात २१ पैकी 9 जागा जिंकल्या आहे. पुण्यावर आजपर्यंत अजित पवार यांचं वर्चस्व होतं. त्यानंतर आता विधानसभेला चित्र थोड बदलं आहे. आता पुण्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
advertisement

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचे चित्र

कसबा
हेमंत रासने भाजप- विजयी
रवींद्र धंगेकर काँगेस - पराभूत
गणेश भोकरे, मनसे - पराभूत
कोथरूड
चंद्रकांत पाटील विजयी
चंद्रकांत मोकाटे, शिवसेना युबीटी - पराभुत
किशोर शिंदे, मनसे - पराभूत
पर्वती
माधुरी मिसाळ,भाजप - विजयी
अश्विनी कदम, राष्ट्रवादी SP - पराभूत
advertisement
पुणे कॅन्टोन्मेंट
सुनील कांबळे, भाजप - विजयी
रमेश बागवे, काँगेस - पराभूत
वडगाव शेरी
सुनील टिंगरे -राष्ट्रवादी AP पराभुत
बापू पठारे- राष्ट्रवादी SP विजयी
खडकवासला
भीमराव तापकीर, भाजप - विजयी
सचिन दोडके, राष्ट्रवादी SP - पराभूत
मयुरेश वांजळे , मनसे- पराभूत
शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे, भाजप - विजयी
advertisement
दत्ता बहिरट, काँग्रेस - पराभूत
हडपसर
चेतन तुपे - राष्ट्रवादी AP विजयी
प्रशांत जगताप - राष्ट्रवादी SP पराभूत
साईनाथ बाबर, मनसे - पराभूत
बारामती
अजित पवार राष्ट्रवादी AP -विजयी
युगेंद्र पवार राष्ट्रवादी SP - पराभूत
इंदापूर
दत्ता भरणे, राष्ट्रवादी AP विजयी
हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी SP पराभूत
advertisement
आंबेगाव
दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी AP विजयी
देवदत्त निकम -राष्ट्रवादी SP पराभूत
जुन्नर
शरद सोनवणे अपक्ष -विजयी
अतुल बेनके अजित पवार गट - पराभूत
सत्यशील शेरकर शरद पवार गट - पराभूत
शिरुर
माउली कटके, राष्ट्रवादी अजित पवार गट - विजयी
अशोक पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट - पराभूत
advertisement
पुरंदर
विजय शिवतारे, शिवसेना -विजयी
संजय जगताप, काँग्रेस - पराभूत
भोर
शंकर मांडेकर, अजित पवार गट - विजयी.
संग्राम थोपटे, काँग्रेस - पराभूत.
मावळ
सुनील शेळके अजित पवार गट - -विजयी
बापू भेगडे अपक्ष - पराभूत.
पिंपरी
अण्णा बनसोडे, अजित पवार गट - विजयी
सुलक्षणा शिलवंत, शरद पवार गट - पराभूत
advertisement
चिंचवड
शंकर जगताप, भाजप - विजयी
राहुल कलाटे, शरद पवार पक्ष - पराभूत
भोसरी
महेश लांडगे, भाजप - विजयी
अजित गव्हाणे, शरद पवार गट - पराभूत
खेड
बाबाजी काळे, शिवसेना UBT - विजयी.
दिलीप मोहिते पाटील अजित पवार गट - पराभूत.
पुणे जिल्हा -2024 चे पक्षीय बलाबल
भाजप - 9
अजित पवार - 8
शिंदे गट - 1
शरद पवार - 1
ठाकरे गट - 1
अपक्ष - 1
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Election Result 2024: 'म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, पुण्यात वारं फिरलं', संपूर्ण विजयी उमेदवाराची यादी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement