Maharashtra Elections : माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला

Last Updated:

Maharashtra Assembly Elections Devendra Fadnavis : अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत आता भाजपचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 
अमित ठाकरेंना भाजपचा पाठिंबा? देवेंद्र फडणवीसांनी म्हटले...
अमित ठाकरेंना भाजपचा पाठिंबा? देवेंद्र फडणवीसांनी म्हटले...
मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते, दादर-माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा असा सूर भाजपमधून उमटत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, अशीही मागणी केली जात आहे. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत आता भाजपचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा यासाठी राज ठाकरे यांनीदेखील चर्चा केली आहे. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा असे भाजपचे मत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दादर माहिममध्ये अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा देण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
advertisement

आमदार सरवणकर उमेदवारी मागे घेणार?

दादर-माहीम मतदारसंघातून सध्या विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत. सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत. सरवणकर यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी आणि अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असे भाजपमधील काही नेते आणि शिंदे गटातील काही नेत्यांनी मत व्यक्त केले. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ.
advertisement

मुख्यमंत्रीही सकारात्मक....

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक दिसून आले. त्यांचीदेखील मान्यता होती. परंतू, आपण उमेदवार न दिल्यास आपली मते ही शिवसेना ठाकरेंकडे जातील असे मत शिवसेनेतून व्यक्त करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

इतर संबंधित बातमी:

advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement